Sambhajinagar News Saam tv
ऍग्रो वन

Sambhajinagar News : पाझर तलावाचा बांध फुटून पाणी शिरले गावात; गावात प्रचंड नुकसान

Sambhajinagar News : राज्यात परतीच्या पावसाचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान संभाजीनगर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे

डॉ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनेक भागात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस होत असून रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आडुळ येथील पाझर तलाव फुटला. पाझर तलाव फुटून तलावातील पाणी गावात घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. 

राज्यात परतीच्या (Rain) पावसाचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. दरम्यान (Sambhajinagar) संभाजीनगर जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर तलाव, धरणाच्या पाणी साठ्यात देखील वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे जिल्ह्यातील पाचोड गाव परिसरात असलेल्या पाझर तलावाचा बांध फुटल्याने तलावातील सर्व पाणी गावात शिरले आहे. यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

दरम्यान तलाव फुटल्यानंतर तलावातील पाणी गावात घुसल्याने शाळा, महाविद्यालय, अरबी मदरशातील विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पाचोड पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या या तलावाची फुटलेली धार बंद करण्यासाठी अद्याप कोणी हि कर्मचारी अधिकारी घटनास्थळी आले नाहीत. यामुळे नागरीक संतप्त झाले असून गावात भीतीचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

Sea Water : पाण्याला रंग नसतो, मग समुद्राचं पाणी निळे का असते?

SCROLL FOR NEXT