Kannad Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Kannad Heavy Rain : कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस; शेतातील पिके भुईसपाट, गावात शिरले पाणी

Sambhajinagar news : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात दोन दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहे

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दाणादाण उडाल्याचे चित्र आहे. यात कन्नड तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने नदी, नाल्याना पूर आला आहे. या पुराचे पाणी गावात व शेतांमध्ये शिरले आहे. पुरामुळे शेतातील पिके पूर्णपणे भुईसपाट झाले आहेत. 

छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात दोन दिवसांपासून सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. संततधार पावसामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहे. नदीला महापुराचे स्वरूप निर्माण झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. तर वरून पाऊस सुरु असल्याने नदी, नाल्यांच्या पुराच्या पातळीत वाढ होत असल्याने हे पाणी शेतांमध्ये शिरत आहे. (Heavy Rain) जोरदार पावसामुळे शेतात असलेले मका, कापूस आणि इतर पिके भुईसपाट झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

गावांमध्येही शिरले पुराचे पाणी 

मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर दिगाव, खेडी, वाकद, नाचनवेल या परिसरातील नदी, नाल्यांना मोठा पूर आला असून नदीचे पाणी गावात शिरण्यात सुरुवात झाली आहे. अशाच पद्धतीने पाऊस चालू राहिल्यास नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भेंडी की मेथी? लिव्हर डिटॉक्ससाठी कोणते ड्रिंक बेस्ट? जाणून घ्या

Milk Price Hike: सणासुदीच्या दिवसांत मुंबईकरांना महागाईचा झटका, दूधाच्या दरात ९ रुपयांची वाढ

Maharashtra News Live Update: भाजप ची राज्य कार्यकारणी ३१ ऑगस्ट रोजी पुण्यात पार पडणार

नेपाळमध्ये पुराचा हाहाकार; काठमांडूला कसे पोहोचणार? ३७ महाराष्ट्रीयन भाविकांसाठी मुख्यमंत्र्यांनी हलवली सूत्रे, नेमकं काय घडलं?

Right Time For Walking: सकाळी की संध्याकाळी? वजन कमी करण्यासाठी नक्की कोणती वेळ चालणे जास्त फायदेशीर

SCROLL FOR NEXT