Sambhajianagar Congress Saam tv
ऍग्रो वन

Sambhajianagar Congress : शेतकऱ्याच्या प्रश्नावरून संभाजीनगरात काँग्रेस आक्रमक; सरसकट कर्ज माफीची मागणी

Sambhajinagar News : शेतकऱ्यावर वारंवार संकट येत असतांना त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत असतो

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यावर वारंवार संकट येत असतांना त्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत असतो. यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. यात मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

सततची नापिकीमुळे (Sambhajinagar) शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात आहे. घेतलेले कर्ज फेडू शकत नाही. तसेच केन्द्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहे. शिवाय मागील काळात केंद्र सरकारने मोठ्या मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ केली. परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, कि कोणत्याही प्रकारची मदत दिली नसल्याचे यावेळी काँग्रेसच्या (Congress) पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

सरकार विरोधात घोषणाबाजी 

शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आंदोलनात उतरलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून धारेवर धरत राज्य सरकारसह केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राज्यातील शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT