Milk Price, rayat kranti sanghatna Saam Tv
ऍग्रो वन

Rayat Kranti Sanghatana News : दूधाच्या खरेदी दरात घसरण; रयत क्रांती संघटना आक्रमक, सरकारला दिला इशारा (पाहा व्हिडिओ)

दरवाढ न दिल्यास शेतकरी राज्यभर रास्ता राेकाे आंदाेलन छेडतील असा इशारा शेतक-यांनी दिला.

विश्वभूषण लिमये

Solapur News : राज्यातल्या दूध पट्ट्यात दूध दराचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. दुधाच्या खरेदी दरात दूध संघाने प्रति लिटर तीन रुपयांची कपात केली आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये प्रचंड असंताेष निर्माण झाला आहे. (Maharashtra News)

ग्रामीण महाराष्ट्रात दूध दराचा प्रश्न पुन्हा पेटण्याची शक्यताय. एप्रिल महिन्यापासून खासगी दूध संघांनी दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर 3 रुपयांची कपात केलीय. उन्हाळ्यात दुधाचा तुटवडा असताना दूध संघाकडून दूध अतिरिक्त असल्याचा दावा करण्यात येतोय. दूध दर कपातीच्या निषेधार्थ रयत क्रांती संघटना रस्त्यावर उतरलीय.

उन्हाळ्यात दुधाळ जनावरांच्या चारापाण्याचा खर्च वाढतो. त्यामुळं दूध संघाने शेतकऱ्यांना (farmers) वाढीव भाव द्यावा अशी मागणी केली जात आहे. दुधाचे भाव (milk price) असेच राहिले तर अवकाळीत पीक गमावलेला शेतकरी देशोधडीला लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kuldeep Yadav Wedding: क्रिकेटपटू कुलदीप यादव आज बोहल्यावर चढणार; वंशिकासोबत घेणार सात फेरे

Hair Care Tips: महिलांनो पार्लरला जाण्याची गरज नाही, घरीच करा केरीटीन ट्रिटमेंट; वाचतील हजारों रुपये

कुणाला किती मिळणार गॅस सिलिंडर? टंचाई होणार दूर,वितरणासाठी राज्य सरकारचा नवा प्लॅन

दर्शनासाठी तासनतास रांग.., भुकेलेल्या साई भक्तांवर उपासमारीची वेळ; गॅस टंचाईमुळे प्रसादालयातून डाळ-भात वगळला|VIDEO

Maharashtra Live News Update : धुळ्यात वीज वितरण विभागाच्या गलथान कारभाराचा फटका बसला गहू उत्पादक शेतकऱ्याला

SCROLL FOR NEXT