Rain News Saam Tv
ऍग्रो वन

Rain: पश्चिम महाराष्ट्रसह काेकणात बरसला पाऊस; द्राक्ष, आंबा बागायतदार चिंतेत

अवकाळी येणा-या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

अमोल कलये, विजय पाटील, भारत नागणे, विश्वभूषण लिमये, संभाजी थोरात

सातारा : गेल्या दाेन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (satara), सांगली (sangli), साेलापूर (solapur), पंढरपूर (pandharpur) तसेच काेकणात (kokan) अधून मधून येणा-या पावसामुळे (rains) तेथील शेतक-यांना द्राक्ष, आंबा बागांची चिंता लागली आहे. या अवकाळी पावसामुळे पुन्हा एकदा शेतीचे नुकसान हाेऊ लागल्याचे शेतक-यांचे म्हणणे आहे. (rain latest marathi update)

आंबा बागायतदार चिंतेत

रत्नागिरी (ratnagiri) जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. संगमेश्वर (sangmeshwar), देवरुख (devrukh), चिपळूण (chiplun), रत्नागिरी, लांजा (lanja) आदी भागात पावसाच्या तुरळक तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा सरी कोसळताहेत. काही ठिकाणी वेगवान वाऱ्यासह विजांचा कडकडाटह पाऊस सुरू आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वातावरणामध्ये उष्मा जाणवत होता. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीमध्ये पावसाची चिन्हे दिसून येत हाेती. अखेर आज सकाळपासूनच पावसाने सुरुवात केली आहे. या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंता मात्र वाढू लागले.

द्राक्ष बागांचे नुकसानीची शक्यता

आज पहाटे पासून पंढरपूर शहर व परिसरात मेघगर्जनेसह पाऊस झाला. या पावसामुळे काढणीस आलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वादळी वा-यासह अवकाळी पाऊस झाल्याने आंबा बागांचेही नुकसान झाले आहे. दरम्यान उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

सोलापुरात पावसाची बॅटिंग

सोलापुरात मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने बॅटिंग केली आहे. मागच्या काही दिवसांपासून सोलापूरचा पारा हा चाळीशीच्या ही पुढे गेला होता. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना या पावसामुळे गारवा मिळाला आहे.

सांगलीत झाडं उन्मळून पडली

सांगलीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामुळे तेथील वाहतूक ठप्प झाली हाेती. काही ठिकाणी वा-यामुळे दुकानावरचे फलक उडून गेल्याचे चित्र आहे.

कराड तालुक्यात पाऊस

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात ठिक ठिकाणी पावसाच्या सरी काेसळत आहेत. सातारा शहरात ढगाळ वातावरण आहे. दाेन दिवसांपुर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागातील काही द्राक्ष बागांचे नुकासन झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध हाेते आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT