parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : नाफेडची १५ ऑक्टोबरपासून सोयाबीन खरेदी; परभणी जिल्ह्यात आठ खरेदी केंद्र

Parbhani News : राज्यात नाफेड मार्फत १९ जिल्ह्यांत हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जाणार असून, एनसीसीएफकडून ७ जिल्ह्यांमध्ये हमीभावाने मालाची खरेदी केली जाणार आहे

राजेश काटकर

परभणी : खरीप हंगामातील उडीद, मुगाची काढणी कधीच झाली आहे. आता सोयाबीन काढणीला सुरवात झाली असून शेतकरी विक्रीसाठी मार्केटमध्ये आणत आहेत. या दृष्टीने जिल्ह्यातील नाफेडच्या आठ केंद्रांवर खरेदी सुरु करण्यात येणार असून सोयाबीन खरेदीला १५ ओक्टोम्बरपासून सुरवात केली जाणार आहे. 

राज्यात नाफेड मार्फत १९ जिल्ह्यांत हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले जाणार असून, एनसीसीएफकडून ७ जिल्ह्यांमध्ये हमीभावाने मालाची खरेदी केली जाणार आहे. यामध्ये (parbhani News) परभणी जिल्ह्यात नाफेडच्या खरेदी केंद्रांचा समावेश राहणार आहे. मूग, उडीद व सोयाबीनच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १ ऑक्टोबरपासूनच सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmer) नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. काही शेतकऱ्यांनी नोंदणी देखील केली आहे. 

परभणी जिल्ह्यात शासनाच्या हमीभावानुसार नाफेडकडून मूग, उडदाची खरेदी १० ऑक्टोबरपासून होणार आहे. तर सोयाबीनची खरेदी १५ ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात ८ ठिकाणी केंद्रांना मंजुरी दिलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना या केंद्रांवर चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT