Parbhani News Saam tv
ऍग्रो वन

Parbhani News : शेतीसाठी घेतले कर्ज; कर्ज फेडीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

Parbhani News : शेतीसाठी घेतले कर्ज; कर्ज फेडीच्या विवंचनेतून शेतकऱ्याने संपविले जीवन

राजेश काटकर

परभणी : डोक्यावर लाखोंचे कर्ज असताना शेतातून अपेक्षित उत्पन्नाची हमी नव्हती. यामुळे कर्जाचा बोजा कसा फेडायचा या विवंचनेत असलेल्या (Farmer) शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना सेलू (Selu) तालुक्यातील आडगाव दराडे येथे घडली असून रविवार संध्याकाळी सातच्या सुमारास हि घटना घडली. (Tajya Batmya)

आडगाव दराडे (परभणी) येथील शेतकरी ज्ञानेश्वर दादाराव गेरकर (वय ४८) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ज्ञानेश्वर गेरकर यांच्याकडे तीन एकर शेती आहे. खरीप हंगामात लागवड करण्यासाठी खाजगी सावकार व बँकेकडून कर्ज काढून सोयाबीनासह (Soyabean) इतर पिकांची लागवड केली होती. मात्र यंदा चांगला पाऊस झाला नसल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा खंड पडल्याने सोयाबीनसह इतर पिके करपू लागली. 

चार लाखाचे कर्ज 

ज्ञानेश्वर गेरकर यांच्यावर बँक व सावकाराचे मिळून साधारण चार लाख रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडावे; ह्या विवंचनेत नेरकर राहत होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बोरी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin: जास्त वेळ पाण्यात राहिल्यानंतर त्वचा आकुंचन का पावते?

Maharashtra Live News Update : हुंडा घेणारे नामर्द, अभिनेते मकरंद अनासपुरेंचं परखड मत

Explainer: गुंतवणूकदारांची वाढली धकधक; चीनवर 100 टक्के टॅरिफ, अमेरिकेच्या निर्णयानं भारतावर काय होणार परिणाम?

Silver Purchases: बनावट चांदीच्या बारची होतेय विक्री, खरेदी करताना कोणती सावधगिरी बाळगावी? जाणून घ्या...VIDEO

Accident News : प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनाला अपघात; एकाचा मृत्यू, ११ जण जखमी

SCROLL FOR NEXT