Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : उत्पन्नवाढीची आशा मावळली, हमीभावातही निराशा, कापसाला केवळ ६९०० प्रतिक्विंटल दर

Parbhani News : परभणी जिल्हात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाची सध्या वेचणी सुरू आहे.

राजेश काटकर

परभणी : यंदा शेतकऱ्याचे प्राचीन नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण अधिक असल्याने कापसासह सर्वच पिकांचे नुकसान झाले. उडीद, मूग, सोयाबीन तसेच मक्याचे देखील उत्पन्न कमी आले आहे. याच दरम्यान कापसाच्या उत्पन्नात देखील घट झाली असून आता हमीभावापेक्षा देखील कमी दराने कापूस खरेदी केली जात आहे.  

परभणी (Parbhani) जिल्हात शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळख असलेल्या कापसाची सध्या वेचणी सुरू आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजारात घेऊन जात आहे. मात्र, खाजगी व्यापाऱ्यांकडून कापसाला ६ हजार ६०० ते ६ हजार ९०० एवढा दर दिला जात आहे. हा दर हमीभावापेक्षा कमी खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. गत वर्षी देखील कापसाला अपेक्षित दर (Cotton Price) मिळाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला होता. यंदा देखील सुरवातीपासूनच कमी दर मिळत आहे. 

शेतकरी चिंतेत 

गेल्यावर्षी नुकसान सोसावे लागल्यानंतर यंदा सुरुवातीला जोमात असलेले कापसाचे पीक अतिवृष्टीने उत्पन्नात देखील मोठी घट पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी दुहेरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातच कापसाला दर मिळत नसल्याने लागलेला खर्च देखील निघतो कि नाही याची चिंता शेतकऱ्यांना लागून आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कपडे फाडले, दगड उचलले, लाथा बुक्क्यांचा मारा! किल्ले सिंहगडावर भर पावसात तुफान राडा

भाजपला मोठा धक्का; प्रदेश उपाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा;राजकीय वर्तुळात खळबळ

कोकण हादरलं ! २२ वर्षीय महिला वनरक्षकाचा घरात आढळला मृतदेह; आंबोली परिसरात खळबळ

पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

Russia-Ukraine War: युक्रेनचा रशियावर मोठा हवाई हल्ला; क्षेपणास्त्र कारखाना उद्धवस्त

SCROLL FOR NEXT