Parabhani News Saam TV
ऍग्रो वन

Parabhani : शेतकऱ्यांवर ओढावलं विचित्र संकट; रात्रीत गळून पडतेय बैलांची जीभ

जवळपास अकरा बैलांची जीभ गळून पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आह़े.

राजेश काटकर

परभणी: जनावरांमध्ये होणाऱ्या लम्पी स्किनच्या (Lumpy skin) संकटातून शेतकरी सावरत असतानाच परतीच्या पावसाने धुमाकूळ घालतल्यामुळे खरिप पिकाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे बळीराजावरील संकटात काही कमी होत असतानाच आता पुन्हा शेतकऱ्यांवर वेगळं विचित्र संकट आलं आह़े.

परभणीमधील (Parbhani) सेलु तालुक्यातील शिराळा या गावामधील एका शेतकऱ्यावर विचित्र आणि तितकेच भयानक संकट आलं आहे. शेतकऱ्याच्या बैलांची जीभ रात्रीत रक्तस्राव होत गळून पडल्याच्या धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिराळा गावातील जवळपास अकरा बैलांची जीभ गळून पडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आह़े.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बैल (Bull) गोठ्यात बांधल्यावर चांगला होता टाकलेली वैरण ही खात होता, सकाळी पाहिले तर तोंडातून रक्तस्राव होत जीभ गळून पडल्याचे शेतकऱ्यांना आढळून आले. पशूवैद्यकिय डॉक्टरांनी तपासणी केल्यावर असा प्रकार पहिल्यांदाच पहावयास मिळत असल्याचे निदान केले आह़े.

पशूवैद्यकिय डॉक्टरांनी बैलांच्या तुटलेल्या जीभ तपासणीसाठी पाठवल्या असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. असा प्रकार केवळ बैलांच्या बाबतीत होत असून गाय (Cow) किंवा म्हशी मध्ये नसल्याचे दिसून आले आह़े.अशा विचित्र प्रकाराने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण असून ह्याचे योग्य निदान करण्याची मागणी होत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौर आणि फायरब्रँड नेत्याचं नगरसेवकपद रद्द?

Health Tips : Heart Attack पासून स्वतःला वाचवायचंय? रोजच्या जगण्यात या ५ गोष्टी नक्की करा, आयुष्य बदलेल

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: ठाकरे शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का

SCROLL FOR NEXT