Pandharpur News Saam tv
ऍग्रो वन

Pandharpur News: सात हजार एकरावरील द्राक्षांना फटका; पंढरपूर तालुक्यात अवकाळीचा दणका

सात हजार एकरावरील द्राक्षांना फटका; पंढरपूर तालुक्यात अवकाळीचा दणका

भारत नागणे

पंढरपूर : सध्या सोलापूर जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच अवकाळी पावसाने (Rain) मोठा दणका शेतकऱ्यांना (Farmer) दिला आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. (Maharashtra News)

अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे‌ द्राक्ष खरेदीकडे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवल्याने द्राक्षाचे भाव पडले आहेत. याबरोबरच निर्यात क्षम द्राक्षालाही देखील फटका बसला आहे. दोन दिवस सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष घड कुजण्यास सुरवात झाली आहे. तर काही ठिकाणी तीव्र उन्हामुळे आता द्राक्षाचे मणी फुटू लागले आहे.

गतवर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांना योग्य बाजार भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना द्राक्ष शेतात तोडून टाकण्याची वेळ आली होती. अशीच परिस्थिती यंदाही निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी नुकसानीची झळ निर्माण झाल्‍याने शेतकरी हतबल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

कसारा घाटातील बोगद्यात बंद पडली वंदे भारत एक्स्प्रेस; प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

52 कोटी भारतीयांच्या ताटातून पौष्टीक आहार गायब, संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड

FDAची थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील कॅन्टीनवर धडक कारवाई; एक्सपायर अन्नपदार्थ आढळल्यानं परवाना रद्द

देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? मोदींच्या मनात फडणवीसच शिक्षणमंत्री

SCROLL FOR NEXT