Onions Saam Tv
ऍग्रो वन

कांद्याने शेतकऱ्यांना रडवलं; नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद! (पहा Video)

15 दिवसांत कांद्याच्या दरात तब्बल 500 रुपयांची घसरण

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक: नाशिकच्या बाजारसमित्यांमध्ये कांद्याचे दर घसरल्यानं यंदा कांदा शेतकऱ्यांना रडवण्याची चिन्हं आहेत. मागील 15 दिवसांत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरात तब्बल 500 रुपयांनी घसरण झालीय. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे लाल आणि उन्हाळ कांदा बऱ्याच प्रमाणात खराब झाला असून कांद्याच्या प्रतवारीत घसरण झालीय.

तर रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर काही बाजारसमित्या बंद राहणार असल्यानं बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्यानं याचा परिणाम कांद्याच्या दरावर झालेला पाहायला मिळतोय. परिणामी लाल कांद्या, उन्हाळ कांद्या, तर पावसामुळे भिजलेल्या कांद्याला जास्त दर घसरलंय. या दरात उत्पादन खर्च भरून निघणंही कठीण असल्यानं कांदा यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याची चिन्हं आहेत.

कोंडी कधी आणि कशी फुटणार?

सध्या लासलगावमध्ये कांद्याचे भाव कमीवर आले आहेत. आता कांदा यायला सुरुवात झाली आहे. ही आवक वाढल्यानंतर पुन्हा कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. हवामान साथ देत नाही. त्यात कधी अतिवृष्टी, तर कधी अवकाळी पावसाने पीक मातीमोल होतात. अन् जेव्हा पीक येते, तेव्हा भाव नसतो त्यामुळे जगायचे तरी कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. त्यामुळे ही कोंडी कधी आणि कशी फुटणार असा सवाल शेतकरी वर्ग विचारत आहेत.

पहा व्हिडीओ-

काय आहेत भाव? (प्रतिक्विंटल)

– लाल कांदा – 600 ते 900 रुपये

– उन्हाळी कांदा – 900 ते 1200 रुपये

– पावसाने भिजलेला कांदा – 200 ते 400 रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT