Onion Price Saam tv
ऍग्रो वन

Onion Price Drop : सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली, दरात दीड हजार रुपयांची घसरण

यंदा कांदा लागवडीनंतर महिनाभरात पाऊस न झाल्याने कांदा करपून गेला. त्याचा परिणाम दरावर आणि मागणीवर झाला आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur APMC Market : सोलापूर येथील मार्केट यार्डात कांद्याची आवक वाढला आहे. यामुळे एका दिवसात दीड हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहयला मिळत आहे. कांद्याचा दर साडेआठ हजार रुपयांवरून सात हजारांपर्यंत आला आहे. (Maharashtra News)

मागील दहा दिवसांपासून सोलापूर बाजार समितीत कांद्याचा दर वाढत गेला. पाच हजारांवरून शनिवारी दर ८५०० रुपयांवर पोहोचला हाेता. मात्र काल आवक वाढल्यामुळे कांद्याचा वाढत्या दराला ब्रेक लागला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कमाल दरामध्ये दीड हजार,तर सरासरी दरामध्ये सहाशे ते सातशे रुपयांची घसरण झाली आहे. काल ३७० ट्रक कांद्याची आवक होती. यंदा कांदा लागवडीनंतर महिनाभरात पाऊस न झाल्याने कांदा करपून गेला. त्याचा परिणाम दरावर आणि मागणीवर झाला आहे.

मागील दहा दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत वाढ होत होती. त्यामुळे दिवाळीमध्ये कांद्याला दहा हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळण्याची आशा व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत होती.

सोलापुरात कांद्याला दर चांगला मिळत असल्याने त्यात रविवारी सुटी असल्याने काल आवक वाढली. जवळपास ३७० ट्रक कांद्याची काल आवक होती. त्यामुळे साडेआठ हजारांवर पोचलेला दर सात हजारांपर्यंत खाली घसरला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT