abdul sattar , majha ek divas majhya balirajasathi , melghat, amravati, farmers  saam tv
ऍग्रो वन

रात्री शेतकऱ्याच्या घरी मुक्काम, पहाटे बांधावर; एक दिवस बळीराजासाठी उपक्रमाचा कृषिमंत्र्यांकडून श्रीगणेशा (पाहा व्हिडिओ)

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Abdul Sattar In Melghat : राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्या, त्यातून निर्माण होणारे नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या शेतकरी आत्महत्या यासंदर्भात योजना तयार करणारे व ती राबविणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणमीमांसा करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक असल्याने “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” (majha ek divas majhya balirajasathi) या उपक्रमाचा आगामी काळात निश्चित फायदा हाेईल असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत (farmers) राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांच्या उपस्थितीत अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे रात्री १० वाजता झाला.

यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकरी शैलेश सावलकर यांच्या निवासस्थानी चक्क मुक्काम करत शेतकऱ्यांसोबत अब्दुल सत्तार यांनी पात्रवाडीवर बसून भाकर,रानभाजीचा जेवणाचा आस्वाद घेतला व त्यांनी रात्री ११ वाजता दोन तास शेतकऱ्यां सोबत सामूहिक बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधला तर रात्रभर कृषी मंत्री सत्तार यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या घरी कुठल्याही प्रकारचा लावाजमा न दाखवता आराम केला.

आज पहाटे पाच वाजल्यापासूनच कृषी मंत्र्याचा मेळघाटात दौरा सुरू झालेला आहे. सत्तार यांनी आज पहाटे ५ वाजता सावरकर तसेच इतर शेतकरी बांधवांशी चर्चा केली. शेतीविषयक अडचणी आवश्यक उपाययोजना याबाबत माहिती जाणून घेतली. गावातील प्रत्येक घराला भेट देऊन ते गावकरी बांधवांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत. त्यातून काय मार्ग काढता येईल याची तेथेच अधिकारी यांच्याशी चर्चा करीत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT