Onion Price Increase Saam tv
ऍग्रो वन

Onion Price Increase : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; कांद्याच्या दरात तेजी, मागणी वाढल्याने भाववाढ

Nashik News : लासलगावसह मनमाड बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त ३ हजार ५०० रुपये तर सरासरी ३ हजार १०० रुपयांचा दर मिळाल्याने कांदा उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 
नाशिक
: मागील आठवड्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सातत्याने घसरत असलेले कांद्याचे दर आता काहीसे वाढू लागले आहेत. सध्या कांद्याच्या दरात रोज वाढ होताना दिसून येत आहे. यामुळे आज मार्केटमध्ये कांद्याला सरासरी ३१०० इतका दर मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

नाशिकच्या लाल कांद्याला देशभरातून मागणी वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात रोज वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ झाली असून आज लासलगावसह मनमाड बाजार समितीत कांद्याला जास्तीत जास्त ३ हजार ५०० रुपये तर सरासरी ३ हजार १०० रुपयांचा दर मिळाल्याने कांदा उत्पादकां मध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सरासरी दर तीन हजार रुपयांच्यावर  

मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये यंदा कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने नाशिकच्या कांद्याला मागणी वाढली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त असा काहीसा प्रकार सध्या मार्केटमध्ये पाहण्यास मिळत आहे. त्यातच तीन महिन्यापुर्वी झालेल्या अवकाळी पावसाने बसलेला फटका याचा परिणाम म्हणून लाल कांदा काहीसा कमी प्रमाणात येत आहे. तरी जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये सरासरी कांद्याचे दर हे ३ हजार रुपयाच्या जवळपास पोहचले आहेत. 

शेतकऱ्यांमध्ये समाधान 

दरम्यान मागील आठवड्यापासून कांद्याचे दर चांगल्यापैकी वाढत आहेत. दर वाढत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई काही प्रमाणात भरुन निघण्यास मदत होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT