Lasalgaon Bajar Samiti Saam tv
ऍग्रो वन

Lasalgaon Bajar Samiti : जम्मू- काश्मीर राज्यात प्रथमच मक्याची निर्यात; लासलगाव येथून २६०० टन मका रेल्वेद्वारे रवाना

Nashik News : खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या मक्याची काढणी झाल्यानंतर शेतकरी मका विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेत आहे. यामुळे मक्याची आवक देखील वाढली आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये सर्वात अधिक आवक होत आहे

Rajesh Sonwane

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आल्याने उत्पादन देखील चांगले झाले आहे. दरम्यान नाशिकच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समितीत मक्याची सर्वात मोठी आवक सध्या होत असून, या मक्याला जम्मू-काश्मीर मधून मागणी वाढल्याने प्रथमच लासलगाव येथून जम्मू-काश्मीरला रेल्वेच्या माध्यमातून निर्यात करण्यात येत आहे.  

खरीप हंगामात लागवड करण्यात आलेल्या मक्याची काढणी झाल्यानंतर शेतकरी मका विक्रीसाठी बाजार समितीमध्ये नेत आहे. यामुळे मक्याची आवक देखील वाढली आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीमध्ये सर्वात अधिक आवक होत आहे. यामुळे मका निर्यात देखील येथून होत असते. यंदा जम्मू- काश्मीर येथील मक्याला मागणी होत असल्याने लासलगाव येथील मका निर्यात केला जात आहे. 

४२ वॅगन मका रवाना 

जम्मू- काश्मीर येथून मक्याची मागणी आल्याने रेल्वे द्वारे वाहतूक करण्यात येत आहे. बारी- ब्राम्हण येथे ४२ वेगन असलेल्या रेल्वे मालगाडीच्या माध्यमातून २६०० टन मका पाठविला जात आहे. मका भरण्याचे काम सध्या सुरु आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातून मका निर्यात होत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

मक्याचे भाव २१०० रुपयांवर स्थिर
नाशिकच्या मनमाडमध्ये बाजार समितीत मक्याची रोज आवक वाढत आहे. बाजार समितीत मक्याला जास्तीत जास्त २ हजार २६१ तर सरासरी २१४१ रुपये दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे. तरी खाजगी मार्केटमध्ये मक्याच्या प्रतवारी नुसार २ हजार ३०० रुपयांच्या पुढे दर मिळत असून या ठिकाणी शेतकऱ्यांना रोख पेमेंट मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल खाजगी मार्केटकडे वाढल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव
रब्बी हंगामात देखील मक्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. वातावरणातील बदलत्या हवामानामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे मका पिकावर लष्करी अळीचा पादुर्भाव झाला आहे. ही लष्करी अळी मकाचे पान कुरतोडून खाते आणि मका पिकाचा शेंडा देखील खात असल्याने मक्याची वाढ होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT