Strawberry Farming Saam tv
ऍग्रो वन

Strawberry Farming : सातपुड्यातील दुर्गम भागात स्ट्रॉबेरीचे उत्पादन; २९ हेक्टर क्षेत्रावर केली लागवड

Nandurbar News : सातपुड्यातील वातावरण स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी चांगले मानले जाते. काही वर्षांपासून स्ट्रॉबेरी उत्पादन घेत आहेत उत्पादन घेण्यासोबत आदिवासी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होतो

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगेत वसलेल्या धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात स्ट्रॉबेरी उत्पादन घेतले जात आहे. या परिसरात स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील २९ हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. याठिकाणी स्ट्रॉबेरीचे उत्पादन चांगले येऊ लागले आहे.  

सातपुड्यातील वातावरण स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी चांगले मानले जाते. मागील काही वर्षांपासून स्ट्रॉबेरी उत्पादन शेतकरी घेत आहेत. चांगले उत्पादन घेण्यासोबत यातून आदिवासी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत असतो. पोषक वातावरण असल्याने येथे स्ट्रॉबेरीच्या शेतीतून चांगला फायदा देखील शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे अनेक शेतकरी आता स्ट्रॉबेरीच्या शेतीकडे वळल्याचे पाहण्यास मिळत आहे. 

प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ हवी 

नंदुरबार जिल्ह्यात स्ट्रॉबेरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. मात्र प्रक्रिया उद्योगही नसल्याने आणि बाजारपेठही नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी येत आहेत. सातपुड्याची रसाळ स्ट्रॉबेरीला राज्य शासनाने मदतीचा हात देऊन मोठ्या शहरात बाजारपेठ आणि प्रक्रिया उद्योगासाठी मोठ्या कंपन्यांना नंदुरबार जिल्ह्यात प्रोत्साहन दिल्यास आदिवासी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार; अशी आशा शेतकऱ्यांना आहे. 

घरोघरी जाऊन करावी लागले विक्री 

स्ट्रॉबेरीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने जिल्ह्यात स्ट्रॉबेरी प्रक्रिया उद्योगही नसल्याने शेतकऱ्यांना उत्पादित स्ट्रॉबेरी विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला आणि ग्रामीण भागात घरोघरी जाऊन स्ट्रॉबेरी विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबाबत पुढाकार घ्यावा; अशी मागणी अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे शहराला मुसळधार पावसाने झोडपले, महापौरांनी केली पाहणी

Accident : लष्करात शोककळा! भरधाव कार विजेच्या खांबाला धडकली, मेजरचा जागीच मृत्यू, २ बडे अधिकारी गंभीर

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

Heart Health: हार्ट अटॅकचा धोका टाळायचाय का? दररोज खा फक्त हे 1 फळ

Yavatmal Flood : पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, आईसह २ मुलींचा मृत्यू; यवतमाळमध्ये पावसाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT