Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : कापसाला भाव मिळत नसल्याने कापसाची घरात साठवणूक; शेतकरी आर्थिक संकटात

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख २५ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. परंतु सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने कापसाच्या मोठ्या नुकसान झाला होता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदुरबार : शेतकऱ्यांचे पांढरे सोनं म्हणून ओळख असलेल्या कापसाला यंदा योग्य भाव मिळत नाही. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कापसाला भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कापूस घरातच साठवणूक करून ठेवत आहे. आगामी काही दिवसात तरी कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख २५ हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. परंतु सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने कापसाच्या मोठ्या नुकसान झाला होता. त्यातच कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणी सापडला असून कापूस घरात साठवणूक करून ठेवण्यावर अधिक भर देत आहे. सुरवातीपासूनच कापसाला ६ ते ७ हजार रुपये इतका दर आहे. 

उत्पादनात घट 

यंदा पावसामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी तोट्याचा राहिला आहे. कोणत्याही पिकाचे चांगले उत्पादन आलेले नाही. तर कापसाच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे. यातच घरात कापूस आल्यानंतर कापसाच्या दरात वाढ नसल्याचे चित्र आहे. यामुळे बहुतांश शेतकरी हे कापूस विक्री न करता घरातच साठवणूक करून ठेवत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. भाव वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

भाव वाढीची अपेक्षा 

कापसाची घरात साठवणूक करून ठेवत असल्याने कापसाची गुणवत्ता कमी होत असल्याने विक्री करताना या कापसाला भाव मिळणार का? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे शेतकरी राजा दुहिदा मनस्थिती सापडला आहे. यामुळे भाव वाढीची अपेक्षा ठेवून असलेल्या शेतकऱ्याला पुढे जाऊन कापसाला चांगला भाव मिळेलच याची शाश्वती नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT