Nandurbar News
Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar: पावसाची विश्रांती; कोळपणी, खत फवारणी शेती कामांना वेग

दिनू गावित

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उशिरा का होईना दमदार पाऊस झाला आहे. नदी नाले व धरणांमध्ये ही मुबलक पाणीसाठा उपलब्ध झालेला आहे. शेती पिकांना उपयुक्त असा झालेल्या पावसाच्या (Rain) विश्रांतीत बळीराजाकडून निदंनी, कोळपणी व पिकांना खत देणे, फवारणी तसेच इतर मशागतीच्या कामांना वेग आला आहे. (Nandurbar News Rain Stop)

जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील धडगाव, (Akkalkuwa) अक्कलकुवा, तळोदा व सपाटी भागातील नवापूर तालुक्यात दमदार पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यातील (Shahada) शहादा, नंदुरबार (Nandurbar) तालुक्यांमध्ये सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कमी राहिला आहे. परंतु, मागील आठ दिवसांपासून जिल्‍ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात भात, तूर, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, भुईमूग, मका, ज्वारी, बाजरी, मिरची आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. सध्या अधून मधून पावसाच्या विश्रांतीत शेतकरी बांधवांकडून कोळपणी, नेदणी, पिकांना खत देणे, फवारणी करत पिकांची काळजी घेतली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lizards News : बापरे! नागपूरमध्ये आढळली सापासारखी पाल; दुर्मिळ प्रजातीचा फोटो व्हायरल

Live Breaking News : महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी

Ranjitsinh Mohite-Patil News | रणजितसिंह मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांची गळाभेट

प्रदर्शनाआधीच Jolly LLB 3 वादाच्या भोवऱ्यात, शुटिंग सुरू होताच न्यायालयात याचिका, नेमकं काय घडलं ?

Narendra Modi : कलम ३७०, राममंदिर अन्.. ४०० पार कशासाठी? PM मोदी थेट बोलले; काँग्रेसवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT