Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : शेतकऱ्यांच्या मालाला १० हजार भाव द्या; शिवसेना उबाठा गटाचा रास्ता रोको

Nandurbar News : नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाट्यावर उबाठा सेनेच्यावतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : शेतकऱ्यांच्या उत्पादीत मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात आहे. यामुळे शेती मालाला किमान १० हजार रुपयांचा भाव मिळावा. यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना उबाठा पक्षामार्फत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांबाबत कृषी अधिकाऱ्यास निवेदन देण्यात आले. 

नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाट्यावर उबाठा सेनेच्यावतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याचे नुकसान होते. यामुळे शेती मालाला चांगला दर देण्याची प्रमुख मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे. यावेळी आंदोलकांनी शेतकऱ्यांना न्याय मिळावा. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा; अशा सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा 

नंदुरबार तालुक्यातील पळाशी फाट्यावर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा; या मागणी करिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेना उबाठा पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा 

उबाठा सेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांना निवेदन देण्यात आले. यापुढे योग्य भाव न मिळाल्यास पक्षामार्फत मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Sena Hearing LIVE Updates :अपात्रतेचा निर्णय आधी, मगच पक्ष कोणाचा ते ठरेल, कपिल सिब्बल यांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे पुन्हा आक्रमक; जरांगेंना थेट माफी मागण्याचं आव्हान

मराठा समाजातील मुलींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यानंतर नवनाथ वाघमारेंची मिरवणूक, VIDEO

IPS अधिकाऱ्याच्या आईचा संशयास्पद मृत्यू; तोंडात कपडा कोंबला अन्..;

Fenugreek water: या 5 व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं मेथीच्या दाण्याचं पाणी; होतील भरपूर फायदे

SCROLL FOR NEXT