red chilli Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar: लाल मिरची खरेदीने ओलांडला दीड लाख क्विंटलचा टप्पा; ३५ कोटींची उलाढाल

ओल्या लाल मिरची खरेदीने ओलांडला दीड लाख क्विंटलचा टप्पा; ३५ कोटींची उलाढाल

दिनू गावित

नंदुरबार : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या ओल्या लाल मिरचीला तेजीचा हंगाम सुरु आहे. मिरची पुन्हा प्रति क्विंटल चार हजारावर आली आहे. नंदुरबार कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत ओल्‍या लाल मिरची (Red Chilli) खरेदीने दीड लाख क्विंटलचा टप्पा ओलांडला आहे. (nandurbar news Purchase of wet red chillies crossed the milestone of 1.5 lakh quintals)

नंदुरबार (Nandurbar) कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीत मिरचीला ३ हजार ९६० रूपयांचा दर मिळाला आहे. मिरची खरेदी करण्यासाठी परराज्यातून व्यापारी येवू लागल्याने दरांमध्ये वाढ होत आहे. यंदा नंदुरबारच्या मिरचीला सर्वाधिक मागणी असल्याने दरवाढीचे सातत्य कायम आहे.

३५ कोटींची उलाढाल

बाजार समितीत (Nandurbar Bajar Samiti) आतापर्यंत १ लाख ५० हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची खरेदी विक्रीतून ३५ कोटींची उलाढाल झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा चांगले दर मिळत आहे. मार्च अखेरपर्यंत सुरू राहणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा अडीच ते तीन लाख क्विंटल आवक होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

Abhyang Snan Time: दिवाळी पहाटच्या दिवशी 'अभ्यंगस्नान' कधी करावे? वाचा शुभ मूहूर्त

Maharashtra Live News Update : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाने केलेल्या हल्ल्यात चिमुकला मुलगा गंभीर जखमी

Diwali 2025 : आली दिवाळी! फटाके फोडताना 'ही' घ्या काळजी, नाहीतर...

Priyadarshini Indalkar: चुनरी तेरी कमाल कर गई.... प्रियदर्शनी इंदुलकरचा हटके लूक

SCROLL FOR NEXT