Papaya Crop Saam tv
ऍग्रो वन

Papaya Crop : पपई पिकावर मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव; नंदुरबार जिल्ह्यात उत्पादक शेतकरी संकटात

Nandurbar News : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू असल्याने त्याठिकाणी पपईची मोठ्या प्रमाणात मागणी. परिणामी पपईची मागणी मोठी वाढली आहे. त्यामुळे पपईला वीस रुपयाच्या विक्रमी दर मिळत आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : नंदुरबार जिल्ह्यात पपई पिकावर सध्या मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. ऐन पपई काढणीच्या तोंडावर पपईवर रोग आल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभ राहील आहे. यावर्षी पपईला विक्रमी असा दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. परंतु पपईवर रोग आल्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट येऊन ठेपले आहे. यामुळे फळ खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  

नंदुरबार जिल्ह्यात पपईच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असते. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पपई लागवड केली होती. दरम्यान मागील काही दिवसात वातावरणात झालेल्या बदलामुळे पपई पिकावर मोझेक व डावनी रोगाचा प्रादुर्भाव पडल्याचे पाहण्यास मिळत होते. यावर काहीसे नियंत्रण मिळाल्यानंतर आता पुन्हा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

पपईला मिळतोय विक्रमी दर 

उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा सुरू असल्याने त्याठिकाणी पपईची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. परिणामी पपईची मागणी मोठी वाढली आहे. त्यामुळे पपईला वीस रुपयाच्या विक्रमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे. पुढील काही दिवस पपईला चांगला दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. 

रोगामुळे शेतकरी संकटात 

एकीकडे पपईच्या मागणीत वाढ झाल्याने दर देखील वाढत आहे. यामुळे आता शेतकरी पपईचे फळ काढणी करत आहे. दरम्यान ऐन पपई काढणीच्या वेळेस आलेल्या रोगामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभा राहिले आहे. पपईवर आलेल्या मोझेक रोगामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभा राहिला आहे. उशिरा लागवड केलेल्या शेतकऱ्यांसमोर हे संकट मोठा असून या संकटातून मार्ग कसा काढावा असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबारमधील तापी नदीवरील प्रकाशा पुलाची दुरावस्था, खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

SCROLL FOR NEXT