Red Onion Saam tv
ऍग्रो वन

Onion Price Drop: दरात घसरण सुरूच; कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळाख्यात

दरात घसरण सुरूच; कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या विळाख्यात

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमावरती भागात मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) आहे. येथे मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जात असते. मात्र उत्पादन खर्च वाढला असून दरातील घट सुरू असल्याने कांदा (Onion) उत्पादक शेतकरी कर्जाच्या विडख्यात सापडल्याचे चित्र आहे. (Letest Marathi News)

कांद्याचे महागडे बियाणे आणि रोपे त्याच्यासोबत कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई अनेक बाबींचा सामना करत कांद्याची लागवड केली. मात्र जेव्हा कांदा काढणी होऊन बाजारात जातो; तेव्हा कांद्याचे दर कसे कमी होतात असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करत आहे. त्यामुळे कांदा लागवड सोडून देण्याच्या विचार नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.

लाल कांद्याला मिळतोय कमी दर

महागडी औषधी खते वाढलेले मजुरीचे दर पाहता लाल कांद्यांना दोन हजार रुपये क्विंटलचा दर मिळणे अपेक्षित होते. मात्र लाल कांद्याचे आवक सुरू झाल्यानंतर कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. लाल कांदा (Nandurbar News) हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी कर्जाच्या विडाख्यात सापडला आहे. कांद्याच्या दरासंदर्भात राज्य शासनाने ठोस भूमिका घेऊन शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघेल, याची तरी हमी द्यावी. नाहीतर कांदा उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होऊन फाशीचा फांदा गळ्याशी लावल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

Bank Closed : आजपासून पुढील ४ दिवस बँका राहणार बंद, जाणून घ्या काय आहे कारण

साताऱ्यात खळबळजनक प्रकार! भाजपच्या नेत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, धक्कादायक कारण समोर

Cancer warning signs: शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात; कॅन्सरचे संकेत ओळखण्यासाठी करा या ५ तपासण्या

Weather Update : आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार; विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT