Nandurbar Onion Market Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Onion Market : बाजार समिती उपलब्ध पण खरेदीसाठी व्यापारीच नाही; नंदुरबारमध्ये कांद्याचे लिलाव बंद

Nandurbar News : नंदुरबार बाजार समितीमध्ये शेजारील असलेला गुजरात, मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यातील शेतकरी कांदा विक्रीसाठी दाखल होत होते.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबारमध्ये कांदा विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ सुरु करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी कांदा विक्री सोयीची झाली आहे. मात्र या बाजार समितीत व्यापारी नसल्यामुळे कांदा लिलाव बाजारपेठ बंद झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी स्वातंत्र्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे. मात्र व्यापारी उपलब्ध नसल्याने बाजारपेठ असून देखील कांदा विक्री होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नंदुरबार बाजार समितीमध्ये शेजारील असलेला गुजरात, मध्य प्रदेश आणि धुळे जिल्ह्यातील शेतकरी कांदा विक्रीसाठी दाखल होत होते. मात्र माल घेण्यासाठी व्यापारी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे. 

शेतकऱ्यांना झाले होते सोयीचे 

नंदुरबारमध्ये काही महिन्यांपूर्वीच स्वतंत्र कांदा विक्रीसाठी बाजारपेठ सुरु करण्यात आली होती. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना ही बाजारपेठ सोयीची झाली होती. अर्थात बाजारपेठ जवळ आल्याने वाहतूक खर्च कमी लागत असल्याने तेवढा फायदा शेतकऱ्यांना होत होता. मात्र बाजार समिती सुरु झाल्यानंतर काही दिवसातच खरेदी करणारे व्यापारी नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

विक्रीसाठी जावे लागतेय सुरत, अहमदाबाद

नंदुरबार बाजार समितीत लिलाव बंद पडल्याने येथे कांदा विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आता सुरत, अहमदाबाद या ठिकाणी जाऊन कांदा विक्री करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीच्या अधिक खर्च लागत असल्याने कांदा पिकावर केलेला खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर येऊन ठेवली आहे. त्यामुळे नंदुरबार बाजार समितीत व्यापारी कधी येणार आणि कांदा विक्री कधी सुरू होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवासी लोकलखाली आला

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT