Banana Crop Saam tv
ऍग्रो वन

Banana Crop : पोषणासाठी केळीवर औषधी फवारणी; केळीचे घड पडले पिवळे, ७५ लाखांचे नुकसान

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद येथील केळी उत्पादक शेतकरी महेंद्र पाटील यांनी आपल्या ११ एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 
नंदूरबार
: केळी लागवड केल्यानंतर शेतकऱ्याने ती वाढविली. घड तयार झाल्यानंतर त्याचे पोषण होण्यासाठी औषधी फवारणी केली. मात्र यात केळीचे पोषण न होता ती पिवळी पडल्याचा प्रकार शहादा (Shahada) तालुक्यातील म्हसावद येथे समोर आली आहे. यात शेतकऱ्याचे (Farmer) साधारण ७० ते ७५ लाखाचे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील म्हसावद येथील केळी उत्पादक शेतकरी महेंद्र पाटील यांनी आपल्या ११ एकर क्षेत्रावर केळीची (Banana Crop) लागवड केली आहे. काही दिवसांनी केळीचा पद पडणार होता. या अगोदर केळीचे घड तयार झाल्यानंतर घडांचे पोषण करण्यासाठी त्यांनी औषधाची फवारणी केली. या औषधाच्या फवारणीमुळे दोनच दिवसात केळी पिवळ्या पडल्याची घटना समोर आली आहे. या फवारणीमुळे पाटील यांचे जवळपास ७० ते ७५ लाखाचे नुकसान झाले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केळीवर केला १५ लाखाचा खर्च 

पाटील यांनी आपल्या अकरा एकर क्षेत्रावर आतापर्यंत १५ लाख रुपये खर्च केलेले आहेत. मात्र कंपनीच्या चुकीमुळे आणि औषधांचा साईड इफेक्टमुळे पाटील यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला समोर जावे लागत आहे. त्यामुळे कृषी विभागाने संबंधित नुकसानीचा पंचनामा करून संबंधित कंपनीवर कारवाई करावी; अशी मागणी पाटील यांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cotton Saree Designs : उन्हाळ्यात 'अशी' करा कॉटनची साडी स्टाइल, 'ही' खास डिझाइन तुमच्याकडे असायलाच हवी

Mumbai Police: मुंबई पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई! फक्त ३ महिन्यात ३६७ फरार आरोपींना अटक

8th Pay Commission: बेसिक सॅलरी ₹७२०००, फिटमेंट फॅक्टर ४ पटीने वाढणार? किती होणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार? वाचा

Maharashtra News Live Update: हिंगोली बाजार समिती बंद करण्याची प्रशासनावर वेळ

बापानंतर मुलाचा कारनामा; कारच्या बोनेटवर उभं राहून विरोधकांना अश्लील शिवीगाळ

SCROLL FOR NEXT