Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला भाव मिळेना; शेतकरी आर्थिक अडचणीत

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात कापसू खरेदीला सुरुवात झाली असून नंदुरबार आणि शहादा बाजार समितीत कापूस खरेदी होत आहे.

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : यंदाचा खरीप हंगाम पूर्णतः वाया गेला आहे. मूग, उडीद, मका पिकांचे चांगले उत्पादन आले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. शिवाय कापसाचे देखील उत्पादन कमीच असण्याची शक्यता आहे. शिवाय आता शेतकरी काढलेला कापूस विक्रीसाठी नेत असून त्याला देखील चांगला भाव मिळत नसल्याने खर्च देखील निघेल कि नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. 

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात कापसू खरेदीला सुरुवात झाली असून नंदुरबार आणि शहादा बाजार समितीत कापूस खरेदी होत आहे. मात्र बाजार समितीचा कापूस खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांच्या प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. स्थानिक व्यापारी हे ४०० ते ५०० रुपये कमी दराने कापसाची (Cotton Price) खरेदी करत होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाले असल्याने पिकांना मोठा फटका बसला होता त्यामुळे उत्पादनात घट आली आहे.

शेतकऱ्यांपुढे संकट 

बळीराजासमोर एकामागून एक संकट उभेच असते. मुळात यंदा सततच्या पावसाने खरीप हंगामाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अर्थात सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून अपेक्षित असे उत्पन्न मिळाले नाही. तर कापसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या. मात्र जास्तीच्या पावसामुळे कापसाला देखील फुल धारणा कमी झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. यात आता जे उत्पन्न आले त्याला देखील चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

French Toast Recipe: सकाळी झटपट करा टेस्टी फ्रेंच टोस्ट; लहानमुलं पोटभर करतील नाश्ता

SCROLL FOR NEXT