Cotton Price Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price: कापसाला मिळतोय भाव; साठवून ठेवलेल्‍या कापसाची पुन्हा विक्री

कापसाला मिळतोय भाव; साठवून ठेवलेल्‍या कापसाची पुन्हा विक्री

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदूरबार : शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठा अडचणीत सापडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरातच कापूस (Cotton) साठवणूक करून ठेवला होता. परंतु आता कापसाला चांगला दर मिळू लागल्‍याने (Farmer) शेतकरीने कापूस विक्री पुन्हा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख १६ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड करण्यात आली होती. मात्र अवकाळी पावसामुळे काही प्रमाणावर कापसाची आवक घटले होते. तर दुसरीकडे भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. परंतु आता समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी आता कापूस कापूस विक्रीकडे कल देताना दिसून येत आहे.

समाधानकारक भाव

कापसाला ७ हजार ५०० पासून ८ हजार २०० रूपयांपर्यंतच्या भाव दिला जात आहे. कापूस हंगामाच्या सुरुवातीला १२ हजाराच्या जवळपास चांगला भाव मिळाला होता. मात्र आवक वाढल्याने कापसाचे दर घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवणूक करून ठेवण्याच्या निर्णय घेतला होता. परंतु आता पुन्हा विक्रीसाठी कापूस बाहेर काढत असून, समाधानकारक भाव कापसाला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Helmet importance: बाईकवर फिरायला जाण्यापूर्वी हेल्मेटबाबत ही एक चूक टाळा

SCROLL FOR NEXT