Nandurbar News Saam tv
ऍग्रो वन

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात सीसीआय, खेडा खरेदी बंद; कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांसमोर संकट

Nandurbar : सीसीआय आणि कापूस खेडा केंद्र देखील बंद असल्याने कापूस विक्री कुठे करायचा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. घरात ठेवलेल्या कापसाचे वजन घटत असून यामुळे देखील शेतकऱ्याला फटका बसण्याची शक्यता

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदुरबार : कापसाला योग्य भाव नसल्याने शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून घरात ठेवला होता. भाववाढीची अपेक्षा आता मावळली असून कापूस विक्री करावी लागणार आहे. दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील कापूस खरेदीसाठीचे सीसीआय व खेडा खरेदी आता बंद झाली आहे. यामुळे कापूस विक्री कोठे करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्याकडे नाईलाजास्तव कापूस विक्री करावी लागणार आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांकडून कापूस साठवणूक करून ठेवला होता. मात्र आता कापूस विक्री केल्याशिवाय पर्याय नाही आहे. तर दुसरीकडे सीसीआय आणि कापूस खेडा केंद्र देखील बंद असल्याने कापूस विक्री कुठे करायचा असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. घरात ठेवलेल्या कापसाचे वजन घटत असून यामुळे देखील शेतकऱ्याला फटका बसण्याची शक्यता आहे. 

खरेदी केंद्र पडताय बंद 

यावर्षी कापूस साठवणुकीसाठी व्यापाऱ्यांकडे जागा नसल्याने वारंवार कापूस खरेदी केंद्र बंद पडत आहे. त्यामुळे याच्या परिणाम शेतकऱ्यांनी साठवणूक करून ठेवलेल्या कापसावर होत आहे. एकीकडे कापसाला भाव नसल्याने शेतकऱ्यांकडून कापूस साठवणूक करून ठेवला जात होता. परंतु आता ऐन वेळेस कापूस विक्रीसाठी जात आहे. परंतु खरेदी केंद्र बंद असल्याने पुन्हा शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट येऊन ठेपले आहे. 

साठवून ठेवलेल्या कापसाने होतोय त्रास 

आता कापूस खरेदी केंद्र कधी सुरू होणार आणि साठवणूक केलेला कापूस कधी विक्री होणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. दरम्यान साठवणूक केलेल्या कापसामुळे रोगराई पसरत असल्याने नाइलाजाने कापूस विक्री करावी लागत आहे. अर्थात भाववाढीच्या अपेक्षेने कापूस साठवून ठेवला होता. मात्र आता विक्री केल्याशिवाय शेतकऱ्यासमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुरबाडमध्ये MIDC च्या जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

उज्जैनच्या मंदिरात चेंगराचेंगरीची स्थिती; नागचंद्रेश्वर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी; ३ जण जखमी

Income Tax च्या ऑफिसला भीषण आग; परिसरात धराचे लोट, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी|VIDEO

भेसळयुक्त साखर कशी ओळखायची? घरी या’ 3 सोप्या स्टेप्सने करा चेक

Rahul Gandhi : राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; कारवाई थांबवण्याचे हायकोर्टाला आदेश, ईडी-सीबीआयलाही थेट सांगितलं

SCROLL FOR NEXT