Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News: हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव; दुबार पेरणीचे संकट

हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव; दुबार पेरणीचे संकट

साम टिव्ही ब्युरो

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पीक धोक्यात आले आहे. यात हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांसमोर (Farmer) दुबार पेरणीच्या संकट उभे राहिले आहे. (Letest Marathi News)

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभऱ्याची मोठी पेरणी करण्यात आली होती. मात्र अवकाळी पाऊस (Rain) आणि ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मर रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हरभऱ्याची रोपे मरत असल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले आहे.

हरभऱ्याचा पेरा अधिक

मागील वर्षी हरभऱ्याला चांगला दर मिळाल्याने यावर्षी रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला प्राधान्य दिल्याचे चित्र होते. मात्र नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांनी टाकलेले भांडवल ही निघणार नसल्याची स्थिती आहे. काही भागात तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असून हरभऱ्यावरील मर रोगामुळे झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी किंवा दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे; अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

खरीप हंगाम अतिवृष्टी आणि परतीच्‍या पावसामुळे वाया गेला होता. शेतकऱ्यांची आस रब्बी हंगामावर लागून होती. मात्र रब्बी हंगामातही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी हातबल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांचा घात की अपघात?'६ जणांचा मृत्यू,मग प्रत्यक्षात ५ बॉडीच का?' आमदाराच्या मनात शंकांचं काहूर

लग्नाच्या पहिल्या रात्री चुकूनही या ५ गोष्टी करू नका; अन्यथा...

कमळ-धनुष्यबाणालाचा निधी मिळणार; मंत्री नितेश राणे यांचे वादग्रस्त वक्तव्य, VIDEO

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ऐन निवडणुकीत शिवसेनेला खिंडार, बड्या नेत्याचा पक्षाला 'जय महाराष्ट्र '

पैसे सुट्टे देणे-घेण्यावरून वाद टोकाला गेला; ग्राहक आणि रिक्षाचालकामध्ये तुंबळ हाणामारी, VIDEO

SCROLL FOR NEXT