Soyabean Price Saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : सोयाबीनच्या दरात पुन्हा ४०० रूपयांची घसरण; शेतकरी संकटात

Nanded News : सोयाबीनच्या दरामध्ये सुरवातीपासूनच घसरण होत आहे. यामुळे काही शेतकर्यानी सोयाबीन विक्री न करता घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने विक्री केला असताना दरात वाढ झाली

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी
नांदेड
: मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सुरु असलेली घसरण सुरूच आहे. हि घसरण आज देखील कायम असून नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

सोयाबीनच्या दरामध्ये सुरवातीपासूनच घसरण होत आहे. यामुळे काही शेतकर्यानी सोयाबीन विक्री न करता घरात भरून ठेवला आहे. काही शेतकऱ्यांनी नाईलाजाने विक्री केला असताना दरात वाढ झाली नाही. सोयाबीनला सरासरी अवघा ४ हजार ते ४ हजार १०० रुपयांपर्यंतच बाजार भाव मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. 

सोयाबीन उत्पादनात घट 

खरीप हंगामात नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीनची पेरणी केली जाते. मात्र, सुरुवातीलाच पावसाने उशिरा हजेरी लावल्याने पेरण्या उशिरा झाल्या. तर सोयाबीन परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना येलो मोझ्याक सारखा रोगही सोयाबीनवर आला होता. सोयाबीन काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. हे संकट असतानाच दर देखील कमी मिळत आहे. 

खर्च अधिक उत्पन्न कमी 

सोयाबीन लागवडी पासून ते काढणीपर्यंत सरासरी १० ते १५ हजार रुपये खर्च लागतो. त्या तुलनेने पाहिजे तसे उत्पन्न झाले नसून एकरी ३ ते ४ क्विंटल उतारा झाला आहे. त्यातच सोयाबीनला बाजारात भाव मिळत नसल्याने लागवड खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

तेलंगणातील नव्या हळदीची आवक सुरू

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये मागिल दोन दिवसापासून तेलंगणा राज्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातील नव्या हळदीची आवक वाढलीय. पहिल्या दिवशी हळदीला बारा हजार ७११ रुपये प्रति क्विंटल दर  मिळाला आहे. गत वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी हळदीला पाचशे रुपये प्रति क्विंटल दर अधिकाचा मिळाला असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT