Bee Attack Saam tv
ऍग्रो वन

Bee Attack : धान पिकाची कापणी करताना मधमाश्यांचा हल्ला; तीन महिला गंभीर जखमी

Bhandara News : पाऊस थांबल्याने शेतातील पीक काढणीच्या कामाला वेग आला आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात देखील सध्या धान कापणीचे काम सुरु असून सकाळीच मजूर शेतात जात असतो

Rajesh Sonwane

शुभम देशमुख 
भंडारा
: शेतात धान कापणीचे काम जिकडे तिकडे सुरु आहे. दुपारी कडक ऊन पडत असल्याने सकाळीच कापणीच्या कामासाठी मजूर शेतात जात आहेत. दरम्यान सकाळच्या सुमारास धान कापणी करिता गेलेल्या मजूर महिलावर मधमाश्यानी हल्ला चढवीला. यात तीन मजूर महिला गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.  

सदरची घटना (Bhandara) भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील बारव्हा शेत शिवारात घडली. यात जोत्स्ना मखरे (वय २९), शिला बोरकर (वय ५०) आणि महानंदा कांबळे (वय ४५) असे हल्ल्यात जखमी झालेल्या मजूर महिलांचे नाव आहे. दरम्यान पाऊस थांबल्याने शेतातील पीक काढणीच्या कामाला वेग आला आहे. त्यानुसार भंडारा जिल्ह्यात देखील सध्या धान कापणीचे काम सुरु असून सकाळीच मजूर शेतात जात असतो. त्यानुसार बारव्हा येथे महिला मजूर धान कापणीसाठी जात असताना मधमाश्यांची हल्ला चढविला. 

मधमाश्याच्या (Bee) हल्ल्यातून बचाव करण्यासाठी महिलांजवळ काहीच साधन नसल्याने तिन्ही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना लागलीच बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र येथे उपचाराची सोय उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून पुढील उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात स्थलातरण करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT