farmer earns lakhs of rupees by cultivating kashmiri apple ber saam tv
ऍग्रो वन

Success Story : काश्मिरी बोर लागवडीतून मिळाला बक्कळ पैसा, वाचा नांदेडच्या शेतकऱ्याची यशोगाथा

शेतीसाठी त्यांना केवळ 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च आला आहे.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded News :

पारंपरिक शेती सोबतच फळबाग लागवड केल्याने लाखाे रुपये कमावू शकताे याचे उदाहरण नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर गावातील फेरोज खान पठाण या शेतक-याने अन्य शेतक-यांपुढे ठेवले आहे. पठाण यांनी काश्मिरी बोराची शेती करून भरघाेस उत्पन्न मिळविले आहे. (Maharashtra News)

फेरोज खान पठाण यांनी त्यांच्या तीन एकर शेतीत काश्मिरी बोराची लागवड केली. जालना येथून हे काश्मीरी बोराचे रोप त्यांनी आणले. तीन बाय तीन मध्ये या रोपांची लागवड करण्यात आली. त्यातून चांगले उत्पादन झाले. माळरान आणि कमी पाण्यात येणारे हे बोराच्या शेतीचा पठाण यांनी येशस्वी प्रयोग करुन दाखविला.

शेतीसाठी त्यांना केवळ 60 ते 70 हजार रुपयांचा खर्च आला आहे. खर्च वगळता पठाण यांना 7 ते 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. पारंपरिक शेती सोबतच असे वेगळे प्रयोग शेतीत केले तर शेती किती फायदेशीर आहे हे पठाण यांनी केलेल्या या काश्मिरी बोराच्या शेतीतून सिद्ध होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पारंपरिक शेती सोबतच फळबाग लागवडीकडे शेतकऱ्याने वळावे असे आवाहन पठाण यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी, डिसेंबर-जानेवारीचे ₹३००० खात्यात एकत्र येणार

Rose Sharbat : घरच्या घरी बनवा फ्रेश गुलाब सरबत, वाचा रेसिपी

Tilache Ladoo : हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचा रेसिपी

Accident : प्रवासी टॅक्सी आणि ट्रकची जोरदार धडक; गाडीचा चक्काचूर; 5 प्रवासी गंभीर जखमी , दोघांची प्रकृती चिंताजनक

Maharashtra Live News Update : कृष्णराज महाडिक घेणार देवेंद्र फडणवीसांची मुलाखत

SCROLL FOR NEXT