Crime News Saam tv
ऍग्रो वन

धक्कादायक! शेतीच्या वादातून पोटच्या मुलांकडूनच वृद्ध पित्याची हत्या

लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथील घटना

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड - शेतीच्या वादातून दोन सख्या भावांनी मिळून वडीलांचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना काल लोहा तालुक्यातील खेडकरवाडी येथे घडली आहे. ही 30 जून रोजी घडली. हावगी कल्याणी असे हत्या झालेल्या पित्याचे नाव आहे. तर सचिन आणि हनुमंत असे या दोन्ही आरोपी मुलांचे नावे आहेत. हवगी आणि मुलांमध्ये गेल्या काही दिवसांपासून शेतीवरून वाद सुरू होता.

हे देखल पाहा -

याचाच राग मनात धरुन हावगी हे शेतात पेरणी करत असताना सचिन आणि हनुमंत यांने वडील हावगी यांच्याशी वाद घालून त्यांना मारहाण केली. त्यानंतर हावगी यांना जमिनीवर पाडून आरोपी हनुमंत यांनी स्वतःच्या वडीलाचे पाय बांधून व सचिन यांने आपल्या वडिलांच्या छातीवर बसून दोरीने गळा आवळून खून केलाची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात आरोपी सचिन आणि हनुमंत विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने मात्र खेडकर वाडीत खळबळ उडाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डोके या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मयत हावगी यांचा मृतदेह 24 तासांपासून माळाकोळी प्राथमिक आरोग्य केंद्रात पडून होता. या प्रकरणी उशिरापर्यंत अंत्यविधी करण्यात आला नसल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून इलेक्ट्रिक गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना

Accident News : लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकपचा भीषण अपघात; ३ तरुणांचा जागीच मृत्यू, ९ जण गंभीर जखमी

Famous Actor Death: प्रसिद्ध अभिनेत्याच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत?

Pune Metro: पुणेकरांच्या कामाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो या दिवशी सुरु होणार, तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT