संजयकाका पाटील - Saam TV
ऍग्रो वन

खासदार संजयकाका पाटील यांनी 'या'साठी व्यक्त केली दिलगिरी

तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची थकीत बिले सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर एकही शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाहीत, असा विश्वास  खासदार संजयकाका पाटील यांनी येथे दिला

विजय पाटील

सांगली : तासगाव आणि नागेवाडी कारखान्याची थकीत बिले सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल. त्याचबरोबर एकही शेतकऱ्यांचे पैसे बुडणार नाहीत, असा विश्वास  खासदार संजयकाका पाटील यांनी येथे दिला. सांगली मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांची बिले देण्यास विलंब झाल्याबद्दल त्यांनी यावेळी दिलगिरी व्यक्त केली.

हे देखिल पहा

''तासगाव आणि नागेवाडी या दोन साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पैसे मिळतील यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, तसेच या दोन्ही कारखान्यांच्या माध्यमातून उपपदार्थ बनवण्याचे प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. केंद्राकडूनही याला मान्यता मिळाली आहे. हे प्रकल्प उभारण्यासाठी केलेल्या गुंतवणूक यामुळे शेतकऱ्यांची बिल देण्यास विलंब झाला, त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो,'' असेही पाटील यांनी सांगितले.

''शेतकऱ्यांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत बुडणार नाहीत. लवकरच या दोन्ही कारखान्यांच्या माध्यमातून उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगला दर देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही संजयकाका पाटील यांनी यावेळी दिली. तसेच त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन करत कोणताही उद्योग आपण लपून केला नसल्याचेही खासदार संजयकाका पाटील यांनी स्पष्ट केले.

Edited By - अमित गोळवलकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT