jalna, mosambi rates saam tv
ऍग्रो वन

Jalna : मोसंबीचा दर गडगडला; उत्पादक शेतकरी चिंतेत

थंडीमुळे फळावर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लक्ष्मण सोळुंके

Jalna News : मोसंबीचं आगार असलेल्या जालना (Jalna) जिल्ह्यात थंडीमुळे मोसंबीला काळसर रंग प्राप्त झाला आहे. सततच्या थंडीचा कडाका मोसंबीच्या फळांना बसल्यामुळे व धुक्यामुळे फळाचा दर्जा घसरला आहे. परिणामी माेसंबीला मिळणारा दर घसरला (Mosambi Rates Slashed) आहे. (Maharashtra News)

यापुर्वी आंबे बहराच्या मोसंबीला बाजारात 35 ते 50 हजार रुपये प्रति टन भाव मिळाला होता. पण थंडी सुरू होताच या थंडीमुळे मोसंबीचा रंग काळसर झाला. त्यामुळे मोसंबीच्या दरात 30 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

सध्या मोसंबीला प्रतिटन 18 ते 26 हजार रुपयांचा भाव मिळत आहे. याचा फटका शेतकऱ्यांना (farmers) बसत आहे. त्यातच गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बुर्शीजन्य रोगाचा प्रादुर्भाव ही मोठ्या प्रमाणात मोसंबी बागेत जाणवत असल्याने याचा मोठ्या फटका मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे.

याबाबत जालना (jalna) येथील व्यापारी नजीरखा पठाण यांनी अनेक माेसंबीच्या बागा पिवळ्या पडल्याचे सांगितले. थंडीचा कडाका मोसंबीच्या फळांना बसल्याने मोसंबीच्या भावावर परिणाम झाला आहे. चांगली मागणी असताना भावात मोठी घसरण झाल्याने शेतकरी अडचणी आल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Traffic Update : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल! १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ प्रमुख रस्त्यांवर जड-अवजड वाहनांना नो एन्ट्री

Maharashtra News Live Update: रायगडच्या पेण मधुन यंदा 70 लाखांहून अधिक गणेश मूर्तींची विक्री

Kitchen Tips : नॉन- स्टिक पॅनची कोटिंग निघतेय? पॅन वापरताना तुम्ही या चुका तर करत नाही ना?

Madh Versova bridge: मढ-वर्सोवा प्रवास आता फक्त ५ मिनिटांत? उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुलाच्या कामाला हिरवा कंदील

Ganpati Decoration Ideas: लाडक्या गणरायासाठी 7 सुंदर मखर डेकोरेशन; घराला मिळेल एकदम रॉयल लूक

SCROLL FOR NEXT