Tomato Price, Hingoli, Amravati, Nashik Saam tv
ऍग्रो वन

Tomato Price Hike : भाज्यांच्या दरांनी गृहिणी चिंतेत, किलाेला टाेमॅटाेसाठी 200 रुपये माेजावे लागणार (पाहा व्हिडिओ)

अनेक शेतक-यांनी टोमॅटो लागवड केली असली तरी त्याला बाजारात यायला उशिर लागणार आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे, संदीप नागरे, अजय सोनवणे

Vegetables Price Hike : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात भाजीपाल्यांचे दर वधारले आहेत. नाशिक, अमरावती, हिंगाेलीसह नवी मुंबईत टाेमॅटाेचा दर गगनाला भिडला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट काेलमडू लागले आहे. (Maharashtra News)

हिंगोलीत (hingoli) भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. पावसाळ्यातील जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्याने जिल्हाभरात भाजीपाल्याचे उत्पादन अचानक घटल्याने पालेभाज्या व फळभाज्या महागल्या आहेत.

हिरव्या मिरचीचा दर प्रति किलो 120 रुपये तर टोमॅटोचा दर हा 100 प्रति किलो झाला आहे. कोथिंबीर, आले देखील दुपटीने महागले आहे. दरम्यान अचानक झालेल्या या दरवाढीमुळे घरातील गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. येत्या दोन दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास भाजीपाल्याचे दर आणखी जास्त वाढणार असल्याची माहिती किरकोळ व्यापाऱ्यांनी दिली.

अमरावतीत भाज्या महागल्या

राज्यात मान्सून दाखल झाला मात्र त्याने आता दडी मारल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्यांवर झाला आहे. पाऊस लांबल्याने अमरावतीत (amravati) भाज्यांचे दर कडाडले आहे. टमाटर १३० रुपये प्रति किलो विकला जात आहे तर आले (अद्रक) 200 रुपये किलोवर पोहचले आहे.

राज्यात अनेक भागात पाऊस पडत असला, तरी अमरावती जिल्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पावसाअभावी आता बाजारात सर्वच भाज्यांच्या दरात दरवाढ झालेली पाहायला मिळते आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागली आहे.

टाेमॅटाे उत्पादक खूष

गेल्या काही महिन्यांपूर्वी टोमॅटो उत्पदकांना टोमॅटोला भाव मिळत नसल्याने ते रस्त्यावर फेकण्याची वेळ आली तर काहींनी आपल्या शेतात जनावरे सोडून ते त्यांना खायला घातले. मात्र आता त्याच टोमॅटोला चांगला दर मिळू लागलाय. नाशिक (nashik) जिल्हयात चांदवड परिसरा अनेक शेतक-यांनी शिल्लक पाण्यावर टोमॅटोची लागवड केली. आज त्यांचा टोमॅटो बाजारात भाव खाऊ लागला आहे. काही दिवसांपुर्वी ३० किलोच्या क्रेटला १२०० ते १५०० रुपयांचा दर मिळाला. म्हणजेच किलोला ४५ ते ५० रुपयांचा दर मिळत असल्याने शेतक-यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनेक शेतक-यांनी टोमॅटो लागवड केली असली तरी त्याला बाजारात यायला उशिर लागणार आहे. त्यामुळे काही दिवस तरी टोमॅटोचे दर हे ८० ते १०० रुपयच्या दरम्यान राहणार असल्याच शेतकरी सांगताहेत.

200 रुपये प्रति किलाे

दरम्यान कानपूर येथे भाज्यांचे दर गगनला भिडले आहेत. आगामी काळात टाेमॅटाेचा दर 200 किलाेपर्यंत जाईल असे विक्रेत्यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Diet Mistakes: कोलेस्टेरॉल कमी करताय, पण 'ही' एक सामान्य चूक ठरू शकते घातक; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर

Beed Politics: मोठी बातमी! बीडमध्ये नवं राजकीय समीकरण, राष्ट्रवादी- शिवसेनेची MIM सोबत युती

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT