Heavy Rain Saam tv
ऍग्रो वन

Heavy Rain : परतीच्या पावसामुळे भात शेती पाण्यात; शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Mokhada News : भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार सध्या जो पाऊस पडतो; तो परतीचा पाऊस नसून कर्नाटक व गोवा किनारपट्टीवर पुर्व व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

Rajesh Sonwane

मोखाडा : पावसाने प्रदीर्घकाळ ओढ दिल्यानंतर परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले. या पार्टीच्या पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे.

भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार सध्या जो पाऊस (Rain) पडतो; तो परतीचा पाऊस नसून कर्नाटक व गोवा किनारपट्टीवर पुर्व व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील दोन दिवस हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज देण्यात आले आहे. अनेक भागात जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. 

मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यात जव्हार, मोखाडा तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतात कापून वाळत ठेवलेले भात सावरायला व झाकायला शेतकऱ्यांना वेळच मिळाला नाही. पावसाच्या पाण्याने कापलेले भात वळे चिंब भिजून तरंगताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. महसूल विभाग व कृषी विभागा मार्फत पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT