Latur News Saam Tv
ऍग्रो वन

शेतकऱ्यांना नुकसानीची तातडीने मदत द्या; आमदार अभिमन्यू पवारांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे कोवळी पिके नष्ट झाली असून संभाव्य उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट दिसून येत आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - शंखी गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई, नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्याची तरतूद करण्याची विनंती आमदार अभिमन्यू पवार यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी (Devendra Fadnavis) यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

लातूर (Latur) जिल्ह्यात जवळपास ५ लाख ७५ हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली असून संततधार पावसामुळे व शंखी गोगलगायींच्या झालेल्या प्रादुर्भावाने पिके नष्ट झाली आहेत. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती अंतर्गतच्या निकषात पिकांवर होणारे किड हल्ले ही बाब समाविष्ट आहे. परंतु शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावाने नुकसानीचा समावेश नसल्याने नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देता येत नसल्याचे महसूल विभागाचे मत आहे.

हे देखील पाहा -

सन २०१७ मध्ये बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस पिकांचे नुकसान झाले होते. तेव्हा शासनाने पिकांच्या बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचा समावेश नैसर्गिक आपत्तीच्या निकषात करून शेतकऱ्यांना NDRF / SDRF द्वारे आर्थिक मदत वितरित केली होती.

लातूर जिल्ह्यात शंखी गोगलगायीचे नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली असून उगवलेली कोवळी पिकेही खावून फस्त करीत आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या NDRF / SDRF निकषात बोंडअळीच्या धर्तीवर शंखी गोगलगायीचा प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची मदत देण्याचा समावेश करण्यात यावा तसेच सदरील नुकसानीचे पंचनामे करून अधिकाधिक आर्थिक मदत देण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती निवेदनाव्दारे आमदार अभिमन्यू पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

शंखी गोगलगाय प्रादुर्भावामुळे कोवळी पिके नष्ट झाली असून संभाव्य उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट दिसून येत आहे. याचा विचार करून प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या तरतुदीनुसार विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के आगाऊ पीकविमा वितरित करण्या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व विमा कंपनी प्रतिनिधीना यांना देण्यात याव्यात अशीही आग्रही विनंती यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT