mirchi kharedi vikri bandh in nandurbar krushi utpanna bazar samiti saam tv
ऍग्रो वन

Nandurbar Mirchi Market: नंदुरबारला पावसाची शक्यता,मिरचीची खरेदी-विक्री बंद; उत्पादकांसह व्यापारी चिंतेत (पाहा व्हिडिओ)

नवीन मिरची खरेदी करून सुकवण्यासाठी व्यापाऱ्यांकडे आता जागा शिल्लक राहिलेली नाही.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar News :

नंदुरबार जिल्ह्यात सातत्याने हवामानात बदल होत आहे. याचा सर्वाधिक फटका आता मिरची उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. ढगाळ वातावरण आणि हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तविल्याने बाजार समितीकडून खरेदी-विक्रीच्या व्यवहार बंद करण्यात आलेला आहे. (Maharashtra News)

त्यामुळे काही शेतकऱ्यांकडून मिरची साठवणूक केली जात आहे. तर काही शेतकऱ्यांनी मिरची तोडणे बंद केले आहे. जिल्ह्यात हवामान बदलत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी केलेली ओली मिरची ढगाळ वातावरणामुळे सुकत नसल्याने, नवीन मिरची खरेदी करून सुकवण्यासाठी व्यापाऱ्यांकडे आता जागा शिल्लक राहिलेली नाही.

पावसापासून आणि ढगाळ वातावरणापासून मिरची वाचवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून मिरची पिकावर गोणपाट टाकण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा यावर्षी विक्रम अशी आवक येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आतापर्यंत दीड लाख क्विंटल मिरचीची खरेदी झाली आहे. हवामान खात्याकडून दहा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरूपाच्या पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखीन भर पडणार का असाच प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT