lampy Virus saam tv
ऍग्रो वन

सोलापुरात जनावरांमध्ये लप्मी स्किनचा धोका! प्रसार रोखण्यासाठी यंत्रणा सतर्क

सांगोला येथील खिलार जनावारांचा आठवडी बाजार अनिश्चित काळासाठी बंद

भारत नागणे

पंढरपूर - सोलापूर (Solapur) जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी स्किनचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात खिलार जनावरांच्या आणि पंढरपुरी म्हैस खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेला सांगोला‌ येथील दर रविवारी भरणारा जनावरांचा आठवडी बाजार अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश दिले आहेत.

जनावरांमध्ये लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. लम्पी स्किनचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील जनावरांचे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश बाजार समितीत्यांना दिले‌ आहेत. त्यानुसार सांगोला बाजार समितीने‌ रविवारी भरणारा खिलार जनावरांचा आठवडी बाजार भरणार नसल्याचे जाहीर केले आहे.

हे देखील पाहा -

कोरोना काळात येथील खिलार जनावरांचा बाजार दोन‌ वर्षे बंद होता. दोन‌ वर्षांनंतर सुरू झालेला‌ जनावरांचा बाजार लम्पी स्किन आजाराच्या साथीमुळे पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येथील बाजारात राज्यासह कर्नाटकातून‌ शेतकरी खिलार जनावरे खरेदी विक्रीसाठी घेवून येतात. दर आठवड्याला येथील बाजारात किमान पाच ते सहा हजार जनावरांची खरेदी विक्री होते. यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. खिलार जानवरांसाठी सांगोल्याचा बाजार प्रसिद्ध आहे.

काय काळजी घ्यावी

जनावरांचं प्रतिबंधात्मक लसीकरण

गोठ्यांची स्व्छता

गायी म्हशी स्वतंत्र बांधाव्यात

डॉक्टरांशी संपर्क

बाधित जनावरांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

Shivsena Dispute : ...तर ठाकरे-शिंदे एकत्र येऊ शकतात; शिंदेसेनेच्या बड्या नेत्याचं भाकित, EXCLUSIVE

SCROLL FOR NEXT