महाराष्ट्राच्या देवभूमीत खरीप पिकांना जिवदान Saam Tv
ऍग्रो वन

महाराष्ट्राच्या देवभूमीत खरीप पिकांना जिवदान

मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. सुरवातीला काही प्रमाणात पाऊस झाला होता. पावसाच्या भरोसे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागणे

पंढरपूर शहर (Pandharpur City) व तालुक्यातील अनेक भागात‌‌ रात्री मेघगर्जेनेसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खरीप पिकांना (Kharif Season) जीवदान मिळाले आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. सुरवातीला काही प्रमाणात पाऊस झाला होता. पावसाच्या भरोसे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी केली होती.

दरम्यान, मागील पंधरा दिवसांपासून पावसाने दांडी मारली होती. त्यामुळे खरीप पिके पावसाअभावी वाया जातात की काय अशी भिती होती. शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. दरम्यान मेघगर्जेनेसह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले. तर ऊस पिकांना हा पाऊस अत्यंत पोषक ठरला आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे शहरातील व उपनगरातील रस्ते चिखलमय झाले होते.

त्यामुळे नागरिकांना चिखलातूनच वाट काढावी लागली. तालुक्यातील उपरी, गादेगाव, वाखरी, टाकळी, कोर्टी, कासेगाव, भंडीशेगाव, शेगावदुमाला यासह अन्य भागातही जोरदार व मध्यमस्वरुपाचा पाऊस झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT