Latur: किनीथोट शिवारात शेतातील सोयाबीन अज्ञातांनी जाळले दीपक क्षीरसागर
ऍग्रो वन

Latur: किनीथोट शिवारात शेतातील सोयाबीन अज्ञातांनी जाळले

सोयाबीनची काढणी करून सोयाबीन बनीम शेतात रचून ठेवलेलं असताना काल रात्री अज्ञात लोकांनी सोयाबीन पेटवून दिले आहे.

दीपक क्षीरसागर, साम टिव्ही, लातूर

दीपक क्षीरसागर

लातूर : लातुर Latur जिल्ह्यातील औसा Ausa तालुक्यातील किनीथोट येथील शेतकरी व्यंकट सिद्राम भुजबळ यांनी शेतातील तीन एक्करवरील सोयाबीनची Soybean काढणी करून सोयाबीन बनीम शेतात रचून ठेवली होती. काल रात्री अज्ञात लोकांनी सोयाबीन पेटवून दिले आहे. यामध्ये सदरील शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी नुकसानीचा पंचनामा तलाठी कार्यालयाकडून करण्यात आला आहे. 

हे देखील पहा-

अतिवृष्टीच्या अस्मानी संकटात अगोदर शेतकरी मेटाकुटीला आला आहे. सततच्या दुष्टचक्रातून शेतकरी पुरता हवालदिल झाला असताना तीन एकरवरील सोयाबीनची काढणी करून ठेवलेले सोयाबीन अज्ञात लोकांनी पेटवून दिले.

यावेळी डोळ्यासमोर उभे सोयाबीन जळत असताना अवघ्या खरिप हंगामातील मेहनत हातून गेलेल्या शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाने नुकसानीची माहिती घेऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तीन एक्करवरील सोयाबीनची बनीम जळाल्याने शेतकरी व्यंकट सिद्राम भुजबळ यांचे सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले आहे याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Housing Society : बॅचलर्सना सोसायटी घर नाकारू शकते का? कायदा नेमका काय सांगतो?

Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकीच्या खात्यात ₹१५०० येणार की ₹३०००, महत्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट

Gauri Ganpati : गौरी गणपतीच्या सणाला..., गणपतीला जास्वंद तर गौरीला कोणते फुले वाहतात?

India : पाण्यावर तरंगणारा महाल! अद्भुत सौंदर्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

SCROLL FOR NEXT