Latur News Saam tv
ऍग्रो वन

Latur News : वीज पडून दोन जणांचा मृत्यू; वादळी वाऱ्यात दोन एकरातील केळीची बाग भुईसपाट

Latur News : अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील महाळंगी, झरी, निलंगा, शिरूर अनंतपाळ यासह इतर भागात नागरिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.

Rajesh Sonwane

संदीप भोसले
लातूर
: राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. दरम्यान लातूर जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्याचा तडाखा बसला असून यात प्रचंड नुकसान झाले आहे. प्रामुख्याने केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली आहे. 

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील माळुंग्री, झरी, निलंगा, शिरूर अनंतपाळ यासह इतर भागात नागरिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वारा असल्याने चाकूर तालुक्यातील झरी गावाच्या शिवारातील दोन एकर (Banana Crop) केळी बाग जमीनदोस्त झाली आहे. तर वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले आहेत तर कोठे तारा तुटल्या आहेत. यामुळे कालपासून ग्रामीण भागातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झालेला आहे. 

वीज पडून दोघांचा मृत्यू 

वादळी वाऱ्यासह विजांच्या (Lightning Strike) कडकडाटासह काही ठिकाणी पाऊस झाला. यामुळे सायंकाळच्या सुमारास (Latur) लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातील माळुंग्री येथे वीज पडल्याची घटना घडली असून यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच  चार जनावरे देखील दगावल्याची घटना घडली. जनावरे दगावल्याने पशुपालक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा

PM Kisan Yojana: तारीख ठरली! ४८ तासात शेतकऱ्यांच्या खात्यात खटाखट २००० येणार, अधिकृत तारीख आली समोर

मोठी बातमी! घरात चारचाकी असेल तर मोठा झटका, रेशन कार्ड कायमचे बंद होणार, वाचा नवे नियम काय आहेत?

Jalgaon : विम्याच्या ५० लाखांसाठी कट रचला, पण गेम फसला; डॉक्टर अन् ४ पोलिसांना बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Kids Height Growth : लहान मुलांची उंची वाढवण्यासाठी करा 'हे' सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT