amravati, nafed center, farmers, police lathi charge saam tv
ऍग्रो वन

Amravati : नाफेड खरेदी केंद्रात गाेंधळ, पाेलिसांचा शेतक-यांवर लाठीचार्ज; नांदगाव खंडेश्वरात तणाव

नाफेडमध्ये हरभराला 5300 रुपये भाव मिळतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- अमर घटारे

Amravati : अमरावती (amravati) जिल्ह्यातील चांदूर रेल्वे (chandur railway), धामणगाव रेल्वे (dhamangoan railway), नांदगाव खंडेश्वर (nandgoan khandeshwar) येथे चना खरेदीच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी (farmers) रात्र जागून काढली. धामणगाव रेल्वे येथे गोंधळ झाल्याने या ठिकाणी दोन तारखेपासून ऑनलाइन नोंदणी खरेदी सुरू होणार आहे. (Breaking Marathi News)

दरम्यान नांदगाव खंडेश्वर येथे शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने या ठिकाणी ऑफलाइन नोंदणी सुरू झाली. चांदूर रेल्वेत मात्र नोंदणीचे आदेशच आले नाही. त्यामुळे मोठी रांग शेतकऱ्यांची पाहावयास मिळाली.

‘नाफेड’मार्फत हरभरा (चणा)‎ खरेदीसाठी आज सकाळी ८ पासून‎ नोंदणी सुरू असल्याचे पत्र सोशल मीडियावर (social media) व्हायरल झाले होते. मात्र काही केंद्रांकरिता नोंदणी बाबतचे आदेशच आले नव्हते. त्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचे पहावयास मिळाला.

चांदूर रेल्वे शहरात सुद्धा रविवारी सायंकाळपासून शेतकऱ्यांनी खरेदी - विक्री संघाच्या आवारात‎ रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत येथील‎ गर्दी वाढतच होती. खासगी बाजारातील भाव हा सरकारी‎ हमी भावापेक्षा कमी असल्यामुळे‎ हरभऱ्याची शासकीस खरेदीकडे कल वाढवला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ladki Bahin Yajana : लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय, VIDEO

Bhai Dooj 2025: आजचा दिवस भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित! भाऊबीज मुहूर्त, पूजा आणि शुभ राशी जाणून घ्या

Bhaubeej Marathi Wishes: भाऊ-बहिणीच्या नात्याचा खास सण! लाडक्या भाऊरायाला पाठवा 'या' खास शुभेच्छा

Budh Gochar: उद्या बुध ग्रह करणार राशीत बदल; दिवाळीमध्ये 'या' 3 राशींची होणार चांदीच चांदी

Maharashtra Politics: ठाकरे बंधूंवरून मविआत बिघाडी; मुंबईत कॉग्रेसचा स्वबळाचा नारा?

SCROLL FOR NEXT