अक्षय शिंदे
जालना : राज्यात अवकाळी पाऊस होत आहे. मागील चार- पाच दिवसांपासून वेगवेगळ्या भागात अवकाळीचा फटका बसत असून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होत आहे. दरम्यान जालना जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे बागायती आणि फळबागांची २० कोटी रुपयांपर्यंत नुकसान झालं आहे. नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाला आहे.
राज्यभरात अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. गारपीट, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत असल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. काही ठिकाणी ऐन काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत आहे. यात प्रामुख्याने कांदा, मका तसेच फळबागांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. जालना जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात नुकसानीची झळ बसली आहे.
नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त
जालना जिल्ह्यात ५ आणि ६ मे रोजी वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस आणि गारपीटीमुळे नुकसान झालं होत. नुकसानीचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून यात जालना, बदनापूर आणि परतुर तालुक्यातील १८४ गावातील २६३८ शेतकरी बाधित झाले आहेत. यात ११३३ हेक्टर बागायती तर ७८९ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान हा नुकसानीचा प्राथमिक अंदाज असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर अहवालात बदल होऊ शकतो अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात मागच्या आठ दिवसात वादळी वारे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या बागायती पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. प्रशासनाच्या आदेशानंतर कृषी सहायकांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतात दाखल होत, या संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करून शासनाला अहवाल सादर केला आहे. यामध्ये केळी बागांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली असून केळी उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने भरीव मदत जाहीर करावी; अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.