Bogus Soybean Seeds Saam tv
ऍग्रो वन

Bogus Soybean Seeds : सोयाबीनचे बोगस बियाणे; जिल्ह्यात ७८ तक्रारी, शेतकरी मेटकुटीला

Jalna News सोयाबीनचे बोगस बियाणे; जिल्ह्यात ७८ तक्रारी, शेतकरी मेटकुटीला

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालना जिल्ह्यात बोगस सोयाबीनच्या बियाण्याच्या ७८ तक्रारी कृषी विभागाला (Agriculture Department) प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ७५ ठिकाणी शेतकऱ्याच्या (Farmer) बांधावर जाऊन कृषी विभागानं पंचनामे केले आहेत. (Live Marathi News)

गेल्या तीन ते चार वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी अस्मानी आणि सुल्तानी संकटाच्या कचाट्यात अडकला असताना यंदाही मान्सून म्हणावा तसा बरसाला नाही. अत्यल्प पावसात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकांची लागवड केली आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात जालना जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री झाल्याने आता या बोगस बियाण्याचा फटका बसायाला सुरवात झाली आहे. त्यामुळे उगम क्षमता नसलेल्या ७८ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे दाद मागितली आहे. दरम्यान ७५ ठिकाणी कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. 

जिल्ह्यात (Jalna News) मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्याच्या कारखान्यावर कृषी विभागाने छापेमारी करून मोठ्या प्रमाणात सोयाबीन बियाण्याचा साठा जप्त करत कारवाई केली होती. मात्र छाप्यापूर्वीच मोठा साठा मार्केटमध्ये विकला गेल्याने त्याचा आता परिणाम दिसायला सुरवात झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : बिर्याणीत मीठ जास्त झाल्याने इंजिनीअर नवरा भडकला; भिंतीवर डोकं आपटून बायकोला संपवलं; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Digestion Problems: थंडीत जेवण पचायला वेळ लागतोय? 'हे' घरगुती उपाय पोटाच्या सगळ्या समस्या करतील दूर

हिंदूंनी किमान तीन,चार मुलं जन्माला घातले पाहिजे; नवनीत राणा यांचा सल्ला

Maharashtra Live News Update: युतीची घोषणा उद्या होणार, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची चर्चा सुरू - संजय राऊत

BJP- Shiv Sena Yuti: भाजप- शिवसेनेच्या युतीमध्ये कोण घालतोय खोडा? लवकर निर्णय घ्या नाहीतर...,शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर इशारा

SCROLL FOR NEXT