Jalgaon News Banana Crop Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: शेतकऱ्याचे केळीची खोडे कापून फेकली; २५ लाखांचे नुकसान

शेतकऱ्याचे केळीची खोडे कापून फेकली; २५ लाखांचे नुकसान

साम टिव्ही ब्युरो

न्हावी (जळगाव) : अट्रावलच्या यावल शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील केळीची खोडे माथेफिरूने कापून (Jalgaon News) फेकल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे (Farmer) शेतकऱ्याचे तब्बल २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. (Tajya Batmya)

यावल तालुक्यात मध्यंतरी अनेक शिवारांमध्ये केळी व अन्य पिकांची नासधूस करण्याच्या विकृत घटना घडल्या होत्या. आता पुन्हा एकदा असाच प्रकार यावल शिवारात घडला आहे. अट्रावल येथील राजेंद्र प्रभाकर चौधरी यांनी यावल (Yawal) शिवारातील शेत गटनंबर ९०७ मध्ये एक हेक्टर ८६ आर. या क्षेत्रात केळीची लागवड केली आहे. राजेंद्र चौधरी यांच्यासह त्यांचे पुत्र भूषण चौधरी शेतात गेले असता, त्यांना शेतातील (Banana Crop) केळीची खोडे मोठ्या प्रमाणात कापून फेकल्याचे दिसून आले.

पोलिसात गुन्‍हा दाखल

राजेंद्र चौधरी यांच्या शेतामधील सात हजार केळीच्या खोडांची व गडांची कापून अज्ञात माथेफिरूंनी फेकल्याचे दिसून आले. याबाबत राजेंद्र प्रभाकर चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात २५ लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे. ही माहिती मिळताच फैजपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे व पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी राजेंद्र चौधरी यांच्या शेताला भेट देऊन नुकसानीची पाहणी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड- संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढील सुनावणी 5 ऑगस्ट रोजी

राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा, पंकजा मुंडेंना बड्या नेत्याकडून थेट ऑफर, राज्याच्या राजकारणात खळबळ

Shahapur: खड्ड्याने घेतला जवानाचा जीव, भिवंडी इमारत दुर्घटनेत अनेकांचे वाचवले होते प्राण

Chia Seeds Side Effects: हेल्दी समजून चिया सीड्स जास्त खाताय? मग, आरोग्याला होऊ शकतात हे ७ गंभीर आजार

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी संध्याकाळनंतर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, नाहीतर...

SCROLL FOR NEXT