Jalgaon News Saam tv
ऍग्रो वन

Jalgaon News: आर्थिक टंचाईने त्रस्त; तरुण शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल

आर्थिक टंचाईने त्रस्त; तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटळले

साम टिव्ही ब्युरो

जळगाव : कंडारी (ता.जळगाव) येथील तरुण शेतकऱ्याने वाघूर धरणाच्या भिंतीलगत झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. अडीच एकर शेतात कापूस (Cotton) लावलेला असून आर्थीक परिस्थीती जेमतेम असलेल्या या शेतकऱ्यावर (Farmer) नेमके कर्ज किती होते याची माहितीही कुटूंबीयांना नाही. (Live Marathi News)

कंडारी (Jalgaon) येथील अरूण रामकृष्ण कोळी (वय ३४) हे तरुण शेतकरी पत्नी वंदना व तीन मुलींसह वास्तव्यास होते. गुरुवारी (१ नोव्‍हेंबर) सकाळी अकराच्या सुमारास घरातून अरूण कोळी शेताच्या दिशेने गेले. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्यामुळे त्यांचे काका बापू कोळी, चुलत भाऊ विनोद कोळी यांच्यासह नातेवाईक परिसरातील जंगलात शोध घेण्यास निघाले. वाघूर धरणाच्या (Waghur Dam) परिसरात शोध घेतल्यावर याठिकाणी धरणाच्या भिंतीला लागून एका झाडाला अरूणचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तत्काळ नशिराबाद पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

आर्थिक अडचण आणि कर्ज..

अरुण कोळी यांच्याकडे अडीच एकरच शेती असून कापूस लावला आहे. अनेक दिवसांपासून ते अर्थिक अडचणीत होते, त्यात लहरी हवामानामुळे शेती उत्पन्नाचा भरवसा नाही. प्रचंड मेहनत करूनही कुटूंब पोसणंही अशक्य होत नसल्याने ते तणावात राहायचे. अरुण यांनी नेमके कोणाकडून कर्ज, हात उसनवारीवर पैसे घेतले हे अद्याप कुटूंबियांनाही सांगता येणे अशक्य आहे. अरुण कोळी यांना तीन मुली असून लहान मुलगी अवघी सहा महिन्यांचीच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? प्रत्येक लेव्हलसाठी पगारवाढ वेगळी होणार

Mumbai Crime: मोबाइल पाहण्यावरून कडाक्याचे भांडण, तरुणाकडून बायको अन् मुलावर काोयत्याने सपासप वार; मुंबई हादरली

Chandra Grahan: चंद्र ग्रहण असताना रंगपंचमी खेळू शकतो का? जाणून घ्या

Sambhajinagar : लाडक्या खंड्याच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यानं घातलं तेरावं , बैलावरच्या प्रेमापोटी मुंडणही केलं

SCROLL FOR NEXT