Banana Price Saam tv
ऍग्रो वन

केळीला विक्रमी भाव; दहा वर्षातील सर्वाधिक दर

केळीला विक्रमी भाव; दहा वर्षातील सर्वाधिक दर

साम टिव्ही ब्युरो

रावेर (जळगाव) : मागील काही महिन्‍यांपुर्वी केळीला भाव नसल्‍याने शेतकरी हवालदील झाला होता. मात्र आता केळीला विक्रमी भाव मिळत असून मागील दहा वर्षामधील हा सर्वाधिक भाव मिळाला आहे. बऱ्हाणपूर बाजारात केळीला २ हजार ६९५ ते २ हजार ७०० रूपये प्रतिक्विंटल भावाने केळीचा (Banana) लिलाव झाला. (jalgaon news Record prices for bananas The highest rate in ten years)

देशभरात सध्या केळीची आवक फारच (Jalgaon News) कमी झाली आहे. खानदेश व निमाड प्रांतातील केळी जेमतेम उपलब्ध आहे. गतवर्षी कुक्कूबर मोझॅक व्हायरसमुळे शेतकऱ्यांनी केळीबागा उपटून फेकल्या होत्या. त्यामुळे लागवडीत मोठी घट झाली होती. यंदा वादळामुळे रावेर (Raver) तालुक्यातील अनेक ठिकाणच्या केळीबागा जमीनदोस्त झाल्या आहेत. यामुळे केळी मालाची आवक कमी झाली आहे. याउलट मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

केळी उत्पादकांना सुखद धक्का

बऱ्हाणपूर बाजारात दोन ट्रक केळीचा लिलाव २ हजार ६९५ व २ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल दराने झाला. तर वापसी केळी मालाचा भाव १ हजार २०१ रुपये प्रतिक्विंटल पोहचला आहे. या उच्चांकी भावाने केळी उत्पादकांना सुखद धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hingoli Crime: प्रेमाची थाप मारून पळवून नेलं; नंतर प्रियकर आणि बापाने केले अत्याचार

कामोत्तेजना वाढवणारं बोगस 'कॅप्सुल' औषधचा भांडाफोड; आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली आरोग्याशी खेळ

शासकीय पडीक जमिनींबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना आदेश

पंतप्रधानपदासाठी खासदार फोडले, 2029च्या निवडणुकीसाठी अमित शाहांची तयारी

'ऑपरेशन टायगर' धोक्यात? एकनाथ शिंदेंची खेळी फसणार?

SCROLL FOR NEXT