cotton 
ऍग्रो वन

कापसाची विक्रमी दराकडे वाटचाल; खानदेशात नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलवर खेडा खरेदी

कापसाची विक्रमी दराकडे वाटचाल; खानदेशात नऊ हजार रुपये प्रतिक्विंटलवर खेडा खरेदी

Rajesh Sonwane

जळगाव : यंदा कापसाची लागवड कमी त्‍यात अतिपावसामुळे कापसाचे झालेल्‍या नुकसानीमुळे उत्‍पादन देखील कमी आले आहे. यामुळे कापसाला यंदा चांगला दर मिळण्याचा अंदाज होता. त्‍यानुसार खानदेशात कापसाची वाटचाल विक्रमी दराकडे सुरू असून काही ठिकाणी ८५०० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल या दरात खेडा (थेट) खरेदी केली जात आहे. (jalgaon-news-record-cotton-prices-Purchase-of-Kheda-at-nine-thousand-per-quintal-in-Khandesh)

खानदेशात जिनींग प्रेसिंग कारखाने गेल्या दहा– पंधरा दिवसात वेगात सुरू झाले आहेत. यामुळे खेडा खरेदीदेखील सुरू झालेली पाहण्यास मिळत आहे. सप्टेंबरमध्ये सुरवातीला ५२०० असलेले कापसाचे दर सप्टेंबरच्या अखेरिस ६ हजार २०० झाले. तर ऑक्टोबरमध्ये दरात सतत सुधारणा होवून हेच दर साडेसात हजार रूपयांवर पोहचले. मागील आठवड्यात भडगाव, पाचोरा, चोपडा, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा आदी भागात कापसाची खेडा खरेदी ८२५० रुपये प्रतिक्विंटल या दरात खरेदी झाली. हा या हंगामातील कापसाला खेडा खरेदीत मिळालेला उच्चांकी दर आहे. परंतु, आजच्‍यास्‍थीतीला हे दर नऊ हजारांवर गेले आहेत.

शेतकरी विक्रीला टाळताय

कापूस खरेदीसाठी मध्य प्रदेश, गुजरातमधील मोठ्या खरेदीदारांचे एजंट खानदेशात दाखल झाले आहेत. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गालगत म्हणजेच तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा, यावल या भागात कापूस दर अधिक मिळत आहेत. कारण या भागातून मध्य प्रदेश, गुजरातेत लवकर पोचणे शक्य आहे. अनेक शेतकरी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस विक्री सध्या टाळत आहेत. कारण उत्पादन कमी आले आहे. खर्च अधिक आहे. नुकसान भरून निघण्यासाठी अधिकचा नफा अपेक्षित आहे.

तर होवू शकते घट

बागायत कापूस पावसात सापडल्‍याने वजनाला जड भरत होता. तर थंडी पडत असल्‍याने देखील कापूस वचणीनंतर वजन जड भरते. कापसाचे दर सध्‍या नऊ हजाराच्‍यावर गेल्‍याने कापूस प्रतिक्विंटल दहा हजारापर्यंत जाण्याची अपेक्षा शेतकरी वर्गात आहे. परंतु, घरात दाबून ठेवलेल्‍या कापसाच्‍या वजनात घट होण्याची शक्‍यता देखील अधिक असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT