Amalner Bajar Samiti Saam tv
ऍग्रो वन

Amalner Bajar Samiti : अमळनेर बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक; भाव स्थिरावले, वाहनांच्या लागल्या रांगा

Jalgaon News : मागील आठवड्यापासून रब्बी हंगामातील पिके बाजारात येऊ लागल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात देखील हीच परिस्थिती असून सर्वाधिक आवक हि हरभऱ्याची

संजय महाजन

जळगाव : रब्बी हंगामातील हरभरा काढणीला सुरवात झाली असून जळगावच्या अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रब्बी हंगामातील शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. यामुळे बाजार समितीच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. परिणामी बाजार समितीमध्ये धान्याची आवक वाढली आहे. प्रामुख्याने हरभरा व तूर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणली जात आहे. 

खान्देशातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या अमळनेर बाजार समितीत शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. विशेषतः हरभऱ्याची आवक विक्रमी पातळीवर पोहोचली असून एकाच दिवशी तब्बल ७ हजार १०० क्विंटल हरभरा बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. यामुळे विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी गर्दी बाजार समितीमध्ये पाहायला मिळत आहे.

सर्वाधिक हरभऱ्याची आवक 
यंदा रब्बी हंगामात हरभरा आणि मक्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले गेले. सध्या शेतकऱ्यांकडून मका, हरभरा, ज्वारी, तुरीची आणि अन्य धान्याची विक्री जोरात सुरू आहे. मागील आठवड्यापासून रब्बी हंगामातील पिके बाजारात येऊ लागल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. या आठवड्यात देखील हीच परिस्थिती असून सर्वाधिक आवक हि हरभऱ्याची होऊ लागली आहे. 

आजूबाजूच्या तालुक्यांमधून शेतकरी दाखल 
हरभऱ्याच्या वाढत्या आवकमुळे सध्या बाजारभाव स्थिर राहण्याची शक्यता आहे. अमळनेर बाजार समितीत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य दर मिळत असल्याने तालुक्यातील तसेच शेजारील शिंदखेडा, चोपडा, धरणगाव, पारोळा येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात येथे शेतमाल विक्रीसाठी येत आहेत. बाजार समितीत एकाच दिवसात १० हजार ४०० क्विंटल धान्याची आवक झाली. यात हरभरा ७ हजार क्विंटलच्या वर आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विक्रोळी एस्टन एक्सप्रेस हायवे लगत असलेल्या इमारतीच्या पार्किंग मध्ये जनरेटरला आग

Kitchen Hacks : जळलेला नॉन स्टिक तवा कसा साफ करावा? फॉलो करा या टिप्स, पुन्हा मिळेल नव्यासारखी चमक

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

SCROLL FOR NEXT